कल्याणी अस्वार सुवर्णपदकाची मानकरी, क्रीडा क्षेत्रात देशपातळीवर झेप
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथील शेतकरी कुटुंबातील कु.कल्याणी कैलास अस्वार ह्या विद्यार्थीनीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला व्दारा आयोजित आंतर महाविद्यालयीन पावर लिफ्टिंग या खेळात सुवर्ण पदकावले आहे. तिची निवड देशपातळीवर कर्नाटक येथे होणाऱ्या पावर लिफ्टिंग या खेळ स्पर्धेत झाली आहे. तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. या तिच्या यशामुळे हिवरखेड नगरीच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मनाचा तुरा रोवल्या गेला आहे. ती श्री. शिवाजी कॉलेज, अकोट ची विद्यार्थिनी असून सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी तसेच कौंतेय फिटनेस सेंटरची सदस्य आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, क्रीडा विभाग प्रमुख प्रफुल देशमुख, प्रशिक्षक नयन करावते, कौंतेय फिटनेसचे संचालक अक्षय मोरखडे यांना देते. तिचे माजी क्रीडा शिक्षक तथा प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी आपल्या मनोगतात तिच्या चिकाटी, मेहनत व तिच्या आई वडिलांच्या पाठबळामुळे यश साध्य केले असल्याचे सांगितले.