क्राइम
वारज / नवप्रहार मीडिया
मृत्यू झाल्यावर अंत्यविधी ही प्रक्रिया आहे. पण अंत्यविधीसाठी निघालेल्या शव यात्रेला पोलिसांनी अर्ध्या रस्त्यातून परत पाठवण्याची घटना बाजोरिया नगरात घडली आहे.
मय्यत महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. मात्र डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून पंचनामा केला.
विवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा (वय 28) असं मृत महिलेचं तर महेश जनार्दन मिश्रा (वय 34) असं आरोपी पतीचं नाव आहे. याबाबत रत्नकला शंकर तिवारी (वय 72, रा. वारज, ता. दारव्हा) यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती.
घरगुती कारणातून आरोपी पतीने वाद घातला. या वादातून पतीने पत्नी दिपालीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला. दिपालीची अंत्ययात्रा जामनकरनगरातून स्मशानभूमीत जाण्यासाठी निघाली. याचवेळी डायल 112 वर संशयास्पद मृत्यूची तक्रार देण्यात आली. त्यानंतर अवधूतवाडी पोलीस जामनकरनगरच्या दिशेने रवाना झाले.
पोलिसांनी आरोपीला अटक कशी केली?
पोलिसांना बाजोरियानगरात अंत्ययात्रा दिसताच थांबवून घरी परत घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. तसेच संशयित पतीला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली. मात्र तो हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगत होता. रात्री उशीरा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दिपालीचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आलं. तसेच याबाबत तक्रारही दाखल झाली. त्यावरून पोलिसांनी पती महेश यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाता अधिक तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |