एकोडी व पिंडकेपार क्षेत्रांतील कृषी फिडरचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले

भंडारा /साकोली : एकोडी पॉवर हाऊस अंतर्गत येणाऱ्या किन्ही, चांदोरी, पिटेझरी व बोद्रा यां गावामधील कृषी फिडरचे काम एकोडी येतील तिडके पेट्रोल पंप जवळ नियमबाह्य रित्या चालू होते ते काम एकोडी येथील सरपंच संजुभाऊ खोब्रागडे,पिंडकेपार येथील सरपंच नंदूभाऊ समरीत साकोली पंचायत समिती सभापती गणेशजी आदे, , डॉ .ललित हेमने प.स. सदस्य, डॉ .वसंताजी बाळबुद्धे, मनोज कोंटागले एकोडी, डॉ . नेपाल रंगारी व उपस्थित असंख्य शेतकरयांनी विद्युत विभागाच्या अभियंता व ठेकेदाराचा घेराव करून सदर काम बंद पाडले.
एकोडि,व पींडकेपार क्षेत्रात कोणत्याच प्रकारचे नदी,नाले किंवा धरण नसल्याने येथील शेतकरी हा विहीर व बोअरवेल च्या माध्यमातून सिंचन करुन शेती करत आहे ,परंतु 8 तास कृषी वीज वितरणासाठी वेगळे फिडर करण्यासाठी लाईन पोलचे काम चालू होते यांची माहिती होताच परिसरातील शेतकऱ्यांनी एकोडी येथील सरपंच संजुभाऊ खोब्रागडे,पिंडकेपार येथील सरपंच नंदूभाऊ समरीत साकोली पंचायत समिती सभापती गणेशजी आदे यांनी ज्युनिअर इंजिनिअर यांना घटनास्थळी बोलवून खड्डे बुजवायला लावले यावेळी प्रामुख्याने हरीश दोनोडे सरपंच परसटोला संदीप मेश्राम पळसपाणी, दिलीप कापगते जितूभाऊ रहाटे उपसरपंच चांदोरी,रिगणजी राऊत उपसरपंच एकोडी,मधोराव येळे ऊसगाव,तसेच घानोड,आमगाव,परसटोला,चांदोरी,सोनेगाव ,ऊसगाव ,आतेगाव बांपेवाडा येथील शेतकरी उपस्थित होते,आणि सदर काम पुन्हा चालू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी आंदोलन कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.