पारा ४० च्या वर; विजेच्या कमी दाबामुळे उपकरणे चालेना.
नागरिक त्रस्त ; कमी दाबाची समस्या कायम.
मारेगाव / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसा पासून उन्हाचा पारा ४० अंश पार झाल्याने उष्ण तेची लाट आली आहे. अशातच वीज वितरण कडून वीज पुरवठा अतिशय कमी दाबाचा होत असल्याने घरातील पंखे, कुलर, फ्रिज निकामी ठरत आहे. त्यामुळे गर्मीने जनता हैराण झाली आहे.
मारेगाव येथे 11 केव्हीचे केंद्र आहे. या केंद्राला राजूर येथून वीज पुरवठा होतो. मात्र गेल्या काही दिवसात पाऊस व वादळ यामुळे या वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड येत आहे.त्यामुळे मारेगाव येथील केंद्राना करंजी, वडकी येथून वीज पुरवठा घेतला जातो. परंतु येथून मिळणारा वीज पुरवठा कमी दाबाचा येत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना कमी दाबाने वीज मिळत असल्याने कुलर, पंखे अतिशय संथ गतीने फिरत असून हवाही लागत नाही. अशी स्थिती आहे.त्यामुळे गर्मीमुळे नागरिकांचे बेहाल होत आहेत.
या कमी दाब वीज पुरावाठ्या चा परिणाम इलेक्ट्रिकल उपकरणावर होत आहे.कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरातील कुलर, पंखे, फ्रिज सह इतर इलेक्ट्रिकल वस्तू खराब व्हायला लागल्या आहे.फ्रिज मधील थंड वस्तू वितळत असल्याने नागरिकांसह हॉटेल चालकाचे आर्थिक नुकसान होत आहे.तर बोरवेल वरील मोटारपंप सुरु होत नसल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे.त्यामुळे वीज वितरणने पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.