एकतर्फी प्रेमातून कथित प्रेयसीच्या घरी जाऊन झाडल्या गोळ्या

प्रेयसीच्या गुप्तांगावर लागल्या गोळ्या : दोन मृत चार जखमी
लखीसराय/नवप्रहार मीडिया
एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या घरी जाऊन गोळीबार केल्याने तरुणीच्या कुटुंबातील सहा लोकांना गोळ्या लागल्या आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तरुणीच्या गुप्तांगावर गोळ्या लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सुषमा (बदललेले नाव ) चे कुटुंब लखीसराय मधल्या कबैय्या भागातील पंजाबी मोहल्ल्यात राहत होते.त्यांच्या शेजारी आशीष चौधरी नावाचा तरुण राहत होता. त्याचे सुषमा वर एकतर्फी प्रेम होते. त्याची सुषमा सोबत लग्न करण्याची इच्छा होती. परंतु दोघांच्या जाती भिन्न असल्याने सुषमाच्या घरच्या लोकांचा या लगणाला विरोध होता.
ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी छट पूजा असल्याने सुषमाचे कुटुंब छट पूजेला गेले होते. हे कुटुंब घरी पोहचताच त्यांच्या घरातून गोळ्या चालण्याचा आवाज आला. शेजारी त्या दिशेने धावले असता त्यांना त्या कुटुंबातील सहा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. शेजाऱ्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात हलविले. त्यापैकी दोन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यात सू समावेश आहे. तर चार पुरुष जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी घटनेबाबात माहिती देताना सांगितले की सुषमा आणि आशिषच्या कुटुंबियांमध्ये 10 दिवसांपूर्वी वाद झाला होता. आशिषला सुष्माशी लग्न करायचं होतं. मात्र सुषमा आणि तिच्या घरची मंडळी याला तयार नव्हती. आशिष हा जातीबाहेरचा असल्याने त्याच्याशी लग्न लावून देण्यास सूषमाच्या घरचे तयार नव्हते. यामुळे आशिष भडकला होता. सुषमा आणि तिच्या कुटुंबियांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा आशिषने हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सुषमाच्या गुप्तांगावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असेही पोलिसांनी सांगितले आहे. आशिष हल्ल्यानंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.