क्राइम

धावत्या रेल्वेत महिला कॉन्स्टेबल वर अत्याचार आरोपीचे एन्काऊंटर

Spread the love

अयोध्या / नवप्रहार मीडिया 

धावत्या रेल्वेत महिलां कॉन्स्टेबल वर अत्याचार केल्याप्रकरणात  आरोपी असलेल्या अनिस रियाझ खान (30)  याचा  एसटीएफ सोबत झालेल्या चकमकीत  एन्काऊंटर झाला आहे. यामध्ये त्याचे दोन सहकारी देखील जखमी झाले आहेत. या चकमकीत एक पीएसआय आणि दोन कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत.

30 ऑगस्ट रोजी शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला हेड कॉन्स्टेबलवर अनिसने अत्याचार केला होता. रक्ताने माखलेली महिला कॉन्स्टेबल ट्रेनच्या सीटखाली सापडली होती. विजार अंगावर नव्हती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वत:हून त्याची दखल घेतली होती. अनिस आणि त्याचे साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार होते.

इनायतनगर भागात अनिस व अन्य आरोपी लपून असल्याचे ‘एसटीएफ’ला कळले. पोलिसांनी घेराव घातला. अनिसने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आझाद तसेच विशंभर दयाल हे अन्य आरोपीही जखमी झाले.अयोध्येतील पुराकलंदर ठाण्यांतर्गत छतरिवा पारा कैल रस्त्यावर ही चकमक झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close