महाशिवरात्रीनिमित्य प्रजापिता ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालय तर्फे शहरातून निघाली भव्य दिव्य शोभायात्रा.
मिरवणूकित झाकिंचे मुख्य आकर्षण
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी शहरातील बोराळा रोडवरील प्रजापीता ब्रहमाकुमारी विश्वाविद्यालय यांचे वतीने आज दिनांक ८ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता महाशिवरात्री निमित्त शहरातून प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालय अंजनगाव सुर्जी बोराळा रोड इथून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी अंजनगाव सुर्जी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय लोटस हाऊस येथे मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी करण्यात आली . त्यानिमित्य शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये शिव पार्वती यांची भव्य दिव्य मूर्ती तसेच महादेवाचे वाहन नंदी महाराज यांची भव्य मुर्ती तसेच जिवंत देखावा दाखविण्यात आला,ही रॅली बोराळा रोड लोटस हाऊस येथून लेंधे मार्केट सावकारपुरा,चावडी चौक,शनिवार पेठ,पान अटाई,गुलजारपुरा,आठवडी बाजार येथपर्यंत काढण्यात आली. यामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालयाचे गजेंद्रजी ठाकरे महाराज यांचे सह, ब्रह्मकुमारीज तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.