शाशकीय
घरकुलधारकांना चांगली वाळू मिळावी यासाठी तहसीलदार गोविंद ‘ वाकडे ‘ समोर प्रहार चे ‘ साकडे ‘ पण …..
डेपो चालक वाकडे यांना जुमानत नाही की ‘ आर्थिक राजकारणा ‘ पुढे तहसीलदारांची नांगी ?
कारवाई न झाल्यास प्रहार चा उग्र आंदोलनाचा इशारा
धामणगाव रेल्वे / विशेष प्रतिनिधी
वाळू डेपो चालकांकडून वाळू विक्रीत आई आणि मावशीचा भेद होत असल्याने प्रहार आक्रमक झाली असून त्यांनी तहसीलदार गोविंद ‘ वाकडे ‘ यांच्या कडे निवेदन देत कारवाईचे ‘ साकडे ‘ घातले होते. पण तहसीलदार गोविंद वाकडे हे मूग गिळून गप्प असल्याने डेपो चालक आणि तहसीलदार यांच्यात ‘ आर्थिक राजकारण ‘ शिजले की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तहसीलदार यांनी त्वरित या विषयात लक्ष न घातल्यास प्रहार ने आक्रमक आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
घरकुल धारक आणि सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर झालेली वाळू या लोकांनां कमी भावात मिळावी आणि त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या उदात्त हेतूने राज्य सरकार ने ‘ वाळू डेपोची ‘ संकल्पना अस्तित्वात आणली . घरकुल धारक आणि सामान्य नागरिकांना 600 रु ब्रॉस प्रमाणे वाळू मिळावी ही त्यामागील मंशा .
वाळू डेपो ठेकेदारा कडून नियमांची ऐसीतेशी – शासकीय नियमानुसार वाळू साठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नदीपात्रातून निघालेली वाळू देणे हे वाळू डेपो चालकाचे कर्तव्य आहे. पण डेपो चालक चांगली वाळू रात्रीच्या ट्रिप साठी ठेवतात. आणि रोडा मिश्रित वाळू घरकुल धारक आणि सामान्य जनतेला देतात.
प्रहार ने तहसीलदार यांना दिले आहे निवेदन – वाळू डेपो चालकांच्या चालबाजी विरोधात प्रहार ने तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पण तहसीलदार गोविंद वाकडे यांनी या विषयाला तीन चार दिवसांचा कालावधी लोटून देखील अध्यापही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे.
डेपो चालक वाकडे यांना जुमानत नाही की आर्थिक राजकारण ? – डेपो चालकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार गोविंद वाकोडे यांच्या कडे करण्यात आल्या आहेत. पण वाकडे याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाकडे यांना डेपो चालक जुमानत नाही की वाकडे आर्थिक राजकारणाचा बळी पडले आहेत ? असा प्रश्न बुद्धिजीवी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
कारवाई न झाल्यास प्रहार उभारणार आंदोलन – तहसीलदार यांनी आगामी एक दोन दिवसात वाळू डेपो चालकांवर कारवाई न केल्यास प्रहार या विरोधात आक्रमक पवित्रा घेत वाळू डेपो समोर निदर्शने आणि गाड्या अडवून आंदोलन करणार असल्याचा ईशारा वाकडे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.