अर्धवट बनलेले अंतर्गत रस्ते देत आहे अपघातास आमंत्रण
घाटंजी ता प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी येथील बरेच रस्ते निर्मानाधीन असून ते सध्या रस्त्यावरुन चालणा-या पादचर,गाडी चालकास डोकदूखी ठरत असून अपघातास आमंत्रण देत आहे. अग्रेसन ज्वेलर्स ते टेलर्स लाईन, नेहरु नगर मधिल डॉ अत्रे यांच्या घरासमोरील रस्ता निर्मनाधिन आहे. येथील रस्त्यावर बोल्डर गिट्ट्या चे मोठ मोठे ढिगारे रस्त्याचे मध्यभागात टाकलेले आहेत.काही बोल्डर गिट्ट रस्त्यावर पसरलेला आहे त्यामुळे रस्ता अपघातग्रस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले.सुमारे १ महिन्या पूर्वी या रस्त्याच्या कोंक्रेटीकरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन स्थानिक लोकप्रतिनधींकडून करण्यात आले होते. त्यानंतर मात्र येथील कंत्राटदाराने काम सुरू करण्याच्या नावावर फक्त वाहतुकीस अडथळा निर्माण करुन ढिगारे रस्त्यावर टाकलेले आहे.हे ठीगारे अनेक वाहन चालकांचे डोखदूखी करत असून अपघात आमंत्रण देत आहे.
ह्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत परिसरातील व्यावसायिक व रहीवासी यांची मागणी घाटंजी नगर परिषदेला करण्यात येत असून त्यासंमंधी तातडीने आवश्यक ते निर्देश संबंधितांना देण्याची मागणी होत आहे.
oooooooooooooooo