एस ओ एस तर्फे शांतता रॅलीचे आयोजन
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
लायन्स क्लब व लिओ क्लब, धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स च्या वतीने महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त शांतता रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. काही विद्यार्थी आणि प्राचार्या के साई नीरजा यांनी महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जीवन कार्याविषयी आपले विचार मांडले. महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जीवनातील प्रसंगांना दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य आणि देशभक्तीपर नृत्य सादर केले. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जीवन कार्याची स्थानिकांना जाणीव करून देण्यासाठी शास्त्री चौक व गांधी चौकात हे पथनाट्य व नृत्य सादर करण्यात आले. या प्रसंगी समाजशास्त्र शिक्षक दिलीप खोब्रागडे यांनी देखील महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी डॉ. पवनकुमार शर्मा, झोन चेअरपर्सन, लॉयन्स क्लब) राजेश पुरोहित (अध्यक्ष लॉयन्स क्लब धामणगाव दाता), लॉयन गोपाल भुत, लॉयन शिवकुमार कोठारी, लॉयन तुलसीदास पापडे, लिओ गणेश चिंचोलकर, आणि प्रामुख्याने सर्व लॉयन्स व लिओ क्लबचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी शिक्षिका दीपाली खरे, इंग्रजी शिक्षक प्रदीप मांडवकर, भुवी बामनोटे व यथार्थ ठाकरे, हिंदी शिक्षक उज्वला तायडे व चंचल इंगोले यांनी केले तर आभार गणित शिक्षिका वसुधा जगताप यांनी मानले. लॉयन्स आणि लिओ क्लब धामणगाव दाता यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला आणि शाळेच्या प्राचार्या के.साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, आयोजन समिती प्रमुख नितीन श्रीवास, संगीत शिक्षक गौरव देवघरे, ग्रंथपाल प्रवीण टोंगे, हिंदी शिक्षक किशोर डोंगरे, विज्ञान शिक्षिका सुप्रिया देशमुख, नृत्य शिक्षक सचिन उईके व गणित शिक्षक शुभम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद व पोलीस स्टेशन, दत्तापूर, धामणगाव रेल्वे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.