कृषी विभागाची धाड पडताच बोगस कापूस बियाणे विक्रेत्याचे पलायन
• सव्वा लाख किंमतीचा माल जप्त.
•पोलिसात गुन्हा दाखल.
मारेगाव / प्रतिनिधी
खोटी जाहिरात करुण राज्यात विक्रीस बंदी असलेले कापूस बियाणे आणून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे दि.9 मे रोजी येथील कृषी विभागाने चिंचळा येथे धाड टाकली. तेव्हा मालाची विक्री चालू होती. कृषी विभागाचे कर्मचारी पाहताच आरोपी कापूस बियानाचे पाकिट घटना स्थळी सोडून पळून गेले. या वेळी सव्वा लाखाचा माल जप्त करुण पोलिसात गुन्हे दाखल केले.
तालुक्यात काही व्यक्ती तेलंगाना, गुजरात राज्यातून बोगस बियाणे आणून तालुक्यात विकत असल्याची चर्चा अनेक दिवसा पासून होती. या प्रतिबंधक बियाणाची खोटी जाहिरात करुण शेतकऱ्यांच्या माथी हे बियाणे मारले जात होते.मात्र आरोपी हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांची फसगत होत होती.
आज चिंचाळा ता. मारेगाव येथे आरोपी विलास वसंता चिकटे वय 44वर्षे हा काही लोकांना सोबत घेऊन प्रतिबंधक कापूस बियाणे विकत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचायत समितीचे प्रभारी कृषी अधिकारी संदीप केरबा वाघमारे यांनी तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी सुनील निकाळजे आणि इतर लोकांना सोबत घेऊन धाड टाकली.
त्यावेळी आरोपी प्रतिबंधक कापूस बियाणे शेतकऱ्यांना विक्री करीत होता. कृषी विभागाचे कर्मचारी बघताच आरोपी विलास चिकटे कापूस बियाणे खरेदी करायला आलेल्या शेतकऱ्यांसह पळून गेला.
या वेळी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपी विलास चिकटे यांचे घरा शेजारील गोठ्यातून सव्वा लाख किंमतीचे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त केले. या बाबत कृषी अधिकारी संदीप वाघमारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून वृत्त लिही पर्यंत कार्यवाही सुरु होती.
तालुक्यात काही वर्षां पासून अशी प्रतिबंधित कापूस बियाणाची विक्री करुण शेतकऱ्यांची फसवणूक सुरु होती. या कार्यवाहीने अनेकांचे धाबे दनालले आहे.