हटके

स्टेजवर नवरी करायला लागली डान्स पण ….

Spread the love

सध्या प्रत्येक लग्नात नवरा-नवर डान्स करणे हे आता ठरलेले असते. कधी नवरा नवरीला सरप्राइज डान्स करुन आनंदी करतो तर कधी नवरी. लग्नात प्रत्येक नवरा-नवरी आपल्या आवडीची गोष्टी करत असतो.

मात्र सध्या अशाच एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात भरस्टेजवर नवरीने डान्स केल्याने नवरदेवाला प्रचंड राग आलेला आहे. मात्र पुढे काय होते ते एकदा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला सर्व लग्नकार्याचा परिसर दिसत असून स्टेजवर नवरा- नवरी आणि त्यांच्या सोबत काही घरातील सदस्यही दिसत आहे. नवरा-नवरी एकमेंकाना गळ्यात हार घातल्यानंतर  नवरी डान्स करण्यास सुरुवात करते. मात्र काही वेळानंतर चक्क नवरीचा स्टेजवरचा डान्स पाहून नवरदेवाला अत्यंत राग आलेला व्हिडिओत दिसत आहे. नवरीला जेव्हा समजचे नवरदेवाला राग आला तेव्हा ती डान्स करण्याची थांबते, अशा प्रकारे लग्नात घडलेली ही गंमत अनेकांच्या मोबाईलमध्ये कैद झालेली असून सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”स्टेजवर आपल्या वधूला असे नाचताना पाहून त्याला राग आला” असे लिहिण्यात आलेले आहे. व्हायरल व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे सध्या समजू शकलेले नाही मात्र नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस व्हिडिओ आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close