विदेशहटके

अहो आश्चर्यम ….. तो जन्मतो नर म्हणून आणि वय झाल्यावर आपोआप बनतो मादी

Spread the love

नवी दिल्ली  / नवप्रहार मीडिया 

                    तुम्ही पौराणिक कथेत अर्ध नारीश्वर बद्दल ऐकले असेल. पण एखादा प्राणी जन्मतः नार असतो पण काही काळानंतर त्याचे मदत रूपांतर होते. आणि तो अंडी देखील घालतो असे आपणाला कोणी सांगितले तर कोणाच्याही तोंडून छे काही तरीच काय ! असे शब्द निघतील. पण पृथ्वीवर असा प्राणी आढळतो. चला तर जाणून घेऊ या या प्राण्याबद्दल.

पृथ्वीवरच्या या सजीवसृष्टीमध्ये कमालीची जैवविविधता आहे. जगभरात असे अनेक प्राणी आहेत, जे त्यांच्या अद्वितीय वेगळेपणासाठी ओळखले जातात.काही प्राणी त्यांचा रंग, आकार, आवाज आणि इतर विशेष गोष्टींसाठीदेखील ओळखले जातात. अशा एका प्राण्याबद्दल माहिती आहे का, की जो जन्मतः नर असतो; पण हळूहळू वाढत्या वयानुसार त्याचं मादीमध्ये रूपांतर होतं? त्याविषयी जाणून घेऊ या.

या विचित्र प्राण्याचं नाव ‘रिबन ईल’ असं आहे. रिबन ईल हा जगातल्या सर्वांत विचित्र प्राण्यांपैकी एक आहे. आपलं सडपातळ शरीर आणि पंखांमुळे तो पौराणिक चिनी कथांमधल्या ड्रॅगनसारखा दिसतो. एवढंच नाही, तर वाढत्या वयासोबत हा प्राणी आपल्या शरीराचा रंगही बदलतो. या प्राण्यांबाबत सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे हे प्राणी जन्मतः नर असतात. नंतर हळूहळू त्यांचं मादीमध्ये रूपांतर होतं. मादी झाल्यानंतर ते अंडीदेखील घालतात.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका युझरने रिबन ईलच्या व्हिडिओसह एक पोस्ट केली आहे. “जेव्हा एखाद्या रिबन ईलची नर म्हणून वाढ पूर्ण होते, तेव्हा तो आपला रंग बदलून मादीमध्ये रूपांतरित होऊ लागतो. मादी झाल्यानंतर त्याचा रंग पिवळा होतो,” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एका रिपोर्टनुसार, रिबन ईल हा अनेक गुणवैशिष्ट्यं असलेला प्राणी आहे. त्याच्याबाबतच्या मनोरंजक बाबी सर्वांना आश्चर्यचकित करतात. या प्राण्याचं जीवनचक्रदेखील अतिशय अनोखं आहे. त्याच्या जीवनचक्रामध्ये एकूण तीन टप्पे असतात. या तीन टप्प्यांमध्ये हा प्राणी आपला रंग तर बदलतोच, शिवाय नरापासून मादीमध्येदेखील रूपांतरित होतो.

जीवनचक्राच्या पहिल्या टप्प्यात हा प्राणी काळ्या रंगाचा असतो. तो आपल्या आयुष्याची सुरुवात नर रूपात करतो. या टप्प्यात त्याच्या शरीरावर चमकदार पिवळी पिसं असतात. आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात (ब्लू फेज) हे ईल प्रौढ होतात. याच टप्प्यात त्यांचा चमकदार काळा रंग बदलून निळा होतो. पंखांचा रंग मात्र बदलत नाही. आयुष्याच्या शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यात त्यांचा रंग पिवळा होतो. तिसऱ्या टप्प्यात हे ईल सुमारे 1.3 मीटर (4 फूट) लांबीचे होतात. त्यानंतर त्याच्या शरीरात मोठा बदल होतो. या टप्प्यात हा जीव मादी अवस्थेत प्रवेश करतो आणि नंतर पूर्णपणे मादी बनतो. याच अवस्थेत तो अंडीही घालतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close