शैक्षणिक

प्राध्यापकांकडून हिंदू देवीदेवतां बद्दल आक्षेपार्ह विधान 

Spread the love

प्राध्यापकांकडून अश्या वागण्याची कल्पना नसते

पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                        उच्चशिक्षित व्यक्ती कडून तुम्ही बावळट व्यक्तीसारख्या वागण्याची कल्पना कोणीच करू शकत नाही. पण सिम्बॉसेस कॉलेज च्या एका प्राध्यापकाने बावळट पणाचे कृत्य केले आहे. या प्राध्यापकाने हिंदू देवीदेवतां बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकाराने संतापलेल्या हिंदू बांधवांनी प्राध्यापकाला पकडून ठाण्यात नेले . पोलिसांनी चौकशी नंतर कारवाईचे आश्वासन देत तूर्तास प्राध्यापकाला  सोडून दिले  आहे.

हिंदू देवीदेवतां बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा या प्राध्यापकाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर काही संतप्त हिंधू बांधवांनी प्राध्यापकांना गाठून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं.तिथे पोलिसांना हे संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि व्हिडीओ देखील दाखवला. मात्र 12 तास उलटून गेल्यानंतर प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला नाही. पुण्यात एका प्राध्यापकाने 12 वीच्या वर्गात शिकवताना हिंदू देवदेवतांसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेनं केला आहे.पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमधील प्राध्यापकाचं हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह विधान याप्रकरणी संबंधित प्राध्यापकाला या हिंदु कार्यकर्त्यांनी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ काढत असल्याचा दावा हिंदू बांधव समाजिक संस्थेनं केला आहे.पोलिसांनी तुर्तास त्या प्राध्यापकाला सोडून दिलं पण चौकशीअंती योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान हे प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच संबंधित शिक्षण संस्थेनं वादग्रस्त विधान करणाऱ्या प्राध्यापकाला कामावरून काढून टाकलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close