विदेश

मरणाच्या दारावर असलेल्या महिलेने आपल्या ३ मिनिटांसाठी लगावली बोली 

Spread the love

नवी दिल्ली / इंटरनॅशनल डेस्क 

                 मरणाच्या दारावर असलेली व्यक्ती ही तिच्या नंतर तिच्या कुटूंबाचे काय होईल हा विचार करून करून मृत्युंच्या अगदी जवळ जातं असते. पण काही लोकं खूपच निधाड्या

कॅन्सरमुळे आपण मरणार आहोत, हे माहिती झालं तर कोणीही सुन्न होणं साहजिक आहे. अशा स्थितीत एखादी व्यक्ती समाजासाठी काही तरी करण्याचा विचारदेखील करू शकणार नाही; मात्र ऑस्ट्रेलियातल्या एका महिलेने मृत्यूपूर्वी एक अनोखा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

कॅन्सरशी झुंज देत असलेल्या 32 वर्षांच्या एमिली लेही हिच्या या निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एमिली एनयूटी कार्सिनोमा नावाच्या कॅन्सरशी झुंज देत आहे. कॅन्सर संशोधनासाठी देणगी देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी तिने सिडनीमध्ये ‘जिवंत कलाकृती’ बनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ती आपल्या उरलेल्या आयुष्यातला काही वेळ अनोळखी व्यक्तींना विकणार आहे. विशेष म्हणजे यासाठी बोली लावली जाणार आहे.

या लिलावात लोकांना एमिलीसोबत तीन मिनिटं व्यतीत करण्याची संधी मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीवर घातक रोगाचा भावनिक आणि मानसिक परिणाम कसा होतो, याबाबत लोक या छोट्याशा भेटीमधून समजून घेतील. एमिलीला 2019मध्ये दुर्मीळ कॅन्सरचं निदान झालं होते. एनयूटी कार्सिनोमा हा एक दुर्मीळ आणि आक्रमक कॅन्सर आहे. मुख्यतः डोकं, मान आणि फुफ्फुसांमध्ये त्याचा संसर्ग होतो. असं असूनही हतबल होण्याऐवजी एमिलीने धैर्याने या संकटाचा सामना केला.

एमिलीसाठी आता तिच्या आयुष्यातला शिल्लक राहिलेला वेळ ही सर्वांत मोठी गोष्ट बनली आहे. हा प्रोजेक्ट तिच्यासाठी खूप विशेष आहे. तिच्या मते, तीन मिनिटांच्या संभाषणामधून लोकांना त्यांच्या जीवनाचं वास्तव कळेल. याशिवाय, कॅन्सर प्रतिबंधाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात मदत होईल.

वयाच्या 27व्या वर्षी एमिलीला कॅन्सरचं निदान झालं होतं. तिने 7NEWS.com.au ला सांगितलं, की ती दररोज 5 ते 10 किलोमीटर धावत असे. त्यामुळे तिने कॅन्सरच्या शक्यतेबद्दल कधीच विचार केला नव्हता; पण वारंवार डोकेदुखी सुरू झाली आणि नंतर एका डोळ्याची दृष्टीही गेली. डॉक्टरांना तिच्या डोक्यात क्रिकेट बॉलच्या आकाराची गाठ सापडली. केमोथेरेपीदेखील उपयुक्त ठरली नाही. आता ती आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close