सामाजिक
घाटंजीत पोळा उत्साहात साजरा
बैलजोड्याची संख्या रोडावली तरी उत्साह मात्र कायम.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
शेतकरी मित्र व शेतकऱ्यांना कामात जिवापाड मेहनत करून शेतीला उभारी देण्यारा बैलच्या मेहनतीचा मान संन्नाम आणि बैलांची कृतज्ञता म्हणून बैलपोळा साजरा केला जातो.यंत्र यूगात बैलसंख्या रोडाऊन ट्याक्टरने शेती विषयक कामकाज करण्याचे प्रमाण जरी वाढले तरी, मात्र बैलपोळा सनानिमीत्य शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा उत्साह घाटंजी तालुक्यातील पोळात दिसून आला. विशेष म्हणजे यंदा पोळ्याच्या गणात ‘माती रे माती काळी माती शासनाचे फुस धोरण अन् दाखवासाठी हाय ५६ इंच की छाती’ या गणातून शासनाचे शेतकरी विषयक सुस्त धोरणावर लक्ष वेधले गेले होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1