कथित सामूहिक बलात्कार झाल्याची परिचरिकेची तक्रार
कानपूर / नवप्रहार डेस्क
आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची आणि खाजगी अवयवात मिरची पूड टाकल्याची तकार एका 30 वर्षोय नर्स ने केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. पण या तक्रारीत प्रथमदर्शनी पोलिसांना तथ्य आढळून आले नाही. पोलिसांना दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे. वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील कारवाई केल्या जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. .
FIR मध्ये काय म्हटलं आहे?
FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने सांगितलं की गोविंद आणि राम मीलन नावाच्या दोन माणसांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या जयंतीदेवी यांनी या दोघांना असं करायला सांगितल्याचा आरोपही तिने केला. पीडितेने सांगितलं की या दोघांनी तिला जंगलात नेलं. त्यानंतर तिथे तिला मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने सांगितलं की ती आरडाओरड करु लागली तेव्हा बाजूच्या शेतांमध्ये काम करणारे काही शेतकरी तिच्या मदतीला धावले ज्यानंतर हे दोघं तिथून पळून गेले. उत्तर प्रदेशातील कानपूरमधल्या एका गावातली ही घटना आहे.
पीडितेने आणखी काय सांगितलं?
पीडितेने सांगितलं जयंतीदेवी तिच्या घराच्या शेजारी राहते. बलात्काराच्या ( Crime News ) घटनेच्या एक दिवस आधी या दोघींमध्ये वाद झाला होता. जयंतीदेवी या महिलेला असं वाटलं होतं की तिच्या नवऱ्याचं आणि पीडितेचं अफेअर सुरु आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधली ही घटना आहे.
गुरुवारी नेमकं काय घडलं? पीडितेच्या पतीने काय सांगितलं?
पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार ती चुरखी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका रुग्णालयात काम करते. गुरुवारी ती तिच्या स्कूटरवरुन रुग्णालयात जात होती तेव्हा गोविंद आणि राम मीलन यांनी तिची वाट अडवली तिला जंगलात घेऊन गेले, शिवीगाळ, मारहाण केली आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही सगळी हकीकत पीडितेने तिच्या नवऱ्यालाही सांगितली. तिच्या नवऱ्याने हे पण सांगितलं की चार जणांनी पकडून तिला जंगलात नेलं होतं. दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी आणि मिरची पावडर टाकली. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची चौकशी करण्यात येते आहे. आत्तापर्यंत सामूहिक बलात्कार झाल्याचा पुरावा किंवा प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकल्याचा पुरावा मिळालेला नाही. ज्यावेळी पूर्ण वैद्यकीय अहवाल मिळेल त्यावेळी त्यात काय नमूद आहे त्यावरुन आम्ही गुन्हा दाखल करु असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान नर्स आणि तिच्या पतीने नर्सवर सामूहिक बलात्कार झाल्याचं म्हटलं आहे.