सामाजिक

तणावमुक्त जिवन जगण्यासाठी खेळ व स्पर्धा आवश्यक: संदीप अढाऊ

Spread the love

तरोडा येथील आर.आर.लाहोटी विद्यालयात शालेय खो खो स्पर्धांचे थाटात उद्घाटन

मोर्शी / संजय गारपवार

सततचा अभ्यास व पालकांच्या अवास्तव अपेक्षा यामुळे विद्यार्थ्यांवर येणारा अतिरिक्त तणाव यातून मुक्तता मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शालेय क्रीडास्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक असल्याचे मत आर.आर.लाहोटी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप अढाऊ यांनी मोर्शी तालुका शालेय क्रीडास्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलतांना व्यक्त केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद अमरावती द्वारा आयोजित१४,१७ व १९ वर्ष वयोगटाच्या मुला मुलींच्या मोर्शी तालुका शालेय खो खो क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आर.आर.लाहोटी विद्यालय तरोडा येथे नुकतेच संपन्न झाले.या स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष दिपककुमारजी लाहोटी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मोर्शी तालुका शालेय क्रीडास्पर्धांचे संयोजक श्रीकांत देशमुख,लोकमान्य विद्यालय पोरगव्हानचे मुख्याध्यापक नरेंद्र रावडे,डी.बी.ठाकरे,नितीन जाणे,सुजित पांडे,सुनीता देवताळे यांच्यासह गावातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जिचकार प्रास्ताविक गजानन चोखट तर आभार योगेश काळे यांनी व्यक्त केले.
या स्पर्धांमध्ये मोर्शी तालुक्यातील १४,१७ व १९ वर्ष वयोगटातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील तीस पेक्षा अधिक संघ सहभागी झाले असून या दोन दिवस चालणाऱ्या संपूर्ण स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक योगेश काळे,दिनेश बदूकले,अनिल तुमडाम,राहुल अढाऊ,रवींद्र शहाडे,अनंत बोलके,सुनील अढाऊ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close