Uncategorized

या तारखेला होणार राज्यात निवडणुका

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

              आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून राज्यात सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या निवडणूक आयोगाच्या पथकाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार असल्याची घोषणा केली आहे..

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगाची टीम तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. या कालावधीत आयोगाने 2024 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आणि तयारीचा आढावा घेतला. Maharashtra Elections date यावेळी त्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही भेट घेतल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले आणि त्यांनी दिवाळीसारखे सण लक्षात घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यास सांगितले. राजकीय पक्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली आणि 17 सीची तरतूद करण्याची मागणी केली.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या 1,00,186 आहे. शहरी भागात 42,585 बूथ आहेत तर ग्रामीण भागात 57,601 बूथ आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close