2000 ची नोट बंद !
८ नोव्हे.2018 ला रात्री ८ वाजता देशाला आर्थिक खाईत टाकणारी घोषणा दुसऱ्या मोहम्मद तुघलकाने केली. भारतीय जनतेने टाळ्या वाजवून ती स्वीकारली.ज्यांनी त्या नोट बंदीच्या घोषणेचा विरोध केला ते देशद्रोही..भ्रष्टाचारी… काळा पैसेवाले अश्या आशयाचे आरोप त्यांच्या वर करून वाचाळवीराणी त्यांची तोंडेबंद केली…देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आपले मत 12 महिन्या नंतर संसदेत व्यक्त केले की नोटबंदी कशी फसवी आहे..गरिबांना तर असे वाटत होते की आता श्रीमंत झाला खलास!पण झाले उलटेच .नोट बंदी नंतर गरीबच झाला खलास!असो. नोट बंदी फसली हे आज सिध्द झाले..हे महत्वाचे.भारताला दुसरा मोहम्मद तुघलक मिळाला यात कोणतीही शंका नाही…या तुघलकाने जसी 2016 च्या नोट बंदी.. करतांना धाडस दाखवले ते धाडस आज का दाखवले नाही..कारण.ती नोट बंदी गरीब व मध्यम वर्गियांना खड्यात घालण्याचे षडयंत्र होते तर ही नोट बंदी श्रीमंतां कडचा काळा पैसा पांढरा करून त्यास मदत करण्याची उचापत होय.असे म्हणणे अतिशयोक्ति होणार नाही.कर्नाटकाच्या निवडणुका पार पडल्या दुसऱ्या तुघलकास लक्षात आले की 2024 मध्ये तुघलकी सत्ते चे पानिपत होणार आणि दिल्ली ची सत्ता जाणार आणि येणारे सरकार पहिला सर्जिकल straik 2000 रू च्या नोटीवर करेल.आणि मग जी काही फटफाजिती होईल ती दुसऱ्या तुघलकी सत्तेच्या जवळ असणाऱ्या बगल- बच्यांची व त्यांची फटफाजीती होणार नाही याची दक्षता म्हणून आज 2000 रू.ची नोट बंदीची घोषणा आर.बी. आई. गव्हरनरच्या तोंडून करवून घेतली.सत्ता जाईल याची चाहूल आजच लागली असे नाही .भारताचे परराष्ट्र मंत्री शिवशंकर यांनी काही दिवस पूर्वी रोख ठोक पणे अमेरिका व ब्रिटन भारताच्या राजकीय घडमोडीवर लक्ष ठेवून असल्याचे मत व्यक्त करून चुकले तर दुसरीकडे इ व्ही म ची साथ धूसर झाली.कारण रशिया युक्रेन च्या युद्धा मुळे रशियन एजंसी ने एव्हीम बाबत हात वर केले असावे अशी शंका घेणे अतिशयोक्ति होणार नाही.500,1000 रू.च्या नोट बंदी ची नियमावली किती जहाल होती हे तेव्हाच सिद्ध झाले जेंव्हा 111 लोक बँकेच्या समोर लाईन मध्ये मृत पावले…आणि आता 2000 रू.च्या नोट बंदी ची नियमावली कशी शिथिल आहे.ह्या वरूनच हे लक्षात येते की दुसऱ्या तुघलकास आपल्या पठीराख्यान कडचा 2000 रू.च्या नोटांच्या माध्यमातून दाबून ठेवलेला काळा पैसा पांढरा करून त्यांना सहकार्य करावयाचे आहे..व येणाऱ्या सरकारच्या सर्जिकाल strik पासून सुरक्षित ही करायचे आहे..आर्थिक संकटात असलेल्या व्यवस्थेला नवीन नोट छपाईचा खर्च आणि बंद होणाऱ्या नोटीचा पहिले छपाई वर झालेला खरच…चिंतेचा विषय नाही का?सरकारने या ऐवजी 2000रू.च्या नोट ज्या मागील 4 वर्षा पासून गायब झाल्या त्या चलनात कशा येतील या साठी काही उपाय योजना करावयास पाहिजे होती कारण जेवढ्या 2000 रु.च्या नोटा बँकेत परत येतील तेवढ्याच 500 रु.च्या नोटा बँका जमाखोराणा परत करेल . हे जमाखोर लोक 500 रु .च्या नोटा पुन्हा जमा करतील यांच्या जमखोरी मुळे 500 ची नोट गायब होईल त्याचा परिणाम अर्थ व्यवस्थेवर गंभीर होईल याचा विचार सरकारने केला नसेल तर….दुसऱ्या तुघलकाच्या सनकी वृती मुळे आधीच आर्थिक खड्यात गेलेला देश आर्थिक खाईत गेल्या शिवाय राहणार नाही….
भास्कर इथापे , वर्धा
9326308319