हटके

ऑर्केस्ट्रा मध्ये काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार 

Spread the love

झारखंड / नवप्रहार मीडिया 

 भारत फिरण्यासाठी आलेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना आता ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत बलात्काराची घटना घडली आहे. परदेशी महिलेवरील बलात्काराच्या घटनेला 24 तास होत नाहीत, तोच झारखंडच्या पालामू जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा दुसरी घटना घडली.

पीडित महिला छत्तीसगडची आहे. ऑर्केस्ट्रामधील महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पालामू बिश्रामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तिघांनी मिळून ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केला. तिघेही पीडितेला ओळखत होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अजून फरार आहे.

पीडित महिला डान्सर असून तिला आरोपींपैकी एकाने कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. गोलू कुमार अस एका आरोपीच नाव आहे. कार्यक्रम रद्द झाला म्हणून पीडित महिला गोलू कुमारच्या रुममध्ये राहिली.

ती बेशुद्ध पडली, त्यानंतर तिघांनी....

पीडितेने तक्रारीत म्हटलय की, तिला पिण्यासाठी म्हणून सॉफ्ट ड्रिंक दिली. ते पिल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अजय कुमार आणि दीवाना कुमार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. गोलू फरार आहे. आयपीसीच्या कलम 328, 376 (2) बलात्कार अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिलेच्या नवऱ्याचे हात-पाय बांधले

त्याआधी स्पॅनिश महिलेसोबत झारखंडमध्ये बलात्काराची घटना घडली होती. आरोपींनी हे निषेधार्ह कृत्य करताना महिलेला लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी संपूर्ण गुन्ह्यादरम्यान महिलेच्या नवऱ्याचे हात-पाय बांधून ठेवले. त्याला सुद्धा मारहाण केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close