खेळ व क्रीडा

क्लासेन नावाच्या वादळाने उडवला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धुव्वा

Spread the love

सेंच्युरीयन / नवप्रहार मीडिया 

                       सेंच्युरियन येथे झालेल्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हेनरीच क्लासेन याने आपल्या वादळी खेळीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवत इतिहास रचला आहे

हेनरिच क्लासेन याने या सामन्यात फक्त 26 बॉलमध्ये 130 धावा ठोकत धमाका केला आहे. क्लासेन याने या फटकेबाजीसह अनेक रेकॉर्ड केले आहेत. हेनरिच क्लासेन याने फक्त 83 बॉलमध्ये 174 धावांची धुवादार खेळी केली. या दरम्यान त्याने 13 सिक्स आणि 13 फोर खेचले. म्हणजेच क्लासेन याने एकूण 174 पैकी 130 धावा या अवघ्या 26 बॉलमध्ये चौकार आणि षटकारांच्या मदतीने केले.

क्लासेन या खेळीसह दक्षिण आफ्रिकेकडून वनडेत एका डावात सर्वाधिक धावा करणारा आठवा बॅटसमन ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून एका वनडेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा गॅरी क्रस्टन यांच्या नावावर आहे. गॅरी यांनी यूएई विरुद्ध 1996 साली 159 बॉलमध्ये नॉटआऊट 188* धावा केल्या होत्या. दरम्यान हेनरिच याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 400 पार मजल मारली आहे. आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 416 धावा केल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close