तो मुंबई वरून अचानक घरी आला दार उघडताच त्याला दिसले असे दृश्य की …..

लखनऊ / नवप्रहार डेस्क
अचानक घरी आलेल्या पतीने दार उघडताच त्याला जे दिसले त्यामुळे त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि त्याने समोरच्या व्यक्तीला गळा आवळला. त्यानंतर त्याने मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला. आणि मुंबईला निघून गेला. पण रणजित कुमार ने ज्या तरुणाची हत्या केली होती. त्याच्या वडीलांनी मुलाच्या हरवल्याची तक्रार केल्याने खुनाचा उलगडा झाला.ही घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील करारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा अडहरा गावात घडली.
इथे राहणाऱ्या महेश यांनी 19 जून रोजी करारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांचा मुलगा विजय (19 वर्षे) हा 16 जून रोजी रात्री 8 वाजता शौचासाठी घराबाहेर गेला होता. तेव्हापासून तो घरी परतला नाही. या माहितीवरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून विजयचा शोध सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली, तेव्हा त्यांना कळलं की विजयचे शेजारी राहणाऱ्या रणजीत कुमार यांच्या पत्नीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. तिलाही तीन मुलं असून तिचा नवरा मुंबईत खासगी नोकरीला आहे.
रणजीतच्या अनुपस्थितीत विजय रात्री त्याच्या घरी येत राहायचा. एका अज्ञात व्यक्तीने रणजीतला फोन करून हा प्रकार सांगितला. सत्य जाणून घेण्यासाठी रणजीत 16 जून रोजी कोणालाही काहीही न सांगता मुंबईहून घरी पोहोचला. त्यानी घराचा दरवाजा उघडला असता आतील दृष्य पाहून त्याला धक्काच बसला. त्यानंतर रणजीतने विजयचा गळा दाबून खून केला. मृतदेह गोणीत भरून प्रयागराजच्या नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि पळून गेला.
पाळत ठेवत पोलिसांनी रणजितच्या पत्नीची कसून चौकशी केली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी कसंतरी आरोपीला मुंबईहून परत बोलावून अटक केली. सीओ सिटी सतेंद्र तिवारी यांनी सांगितलं की, मृताचे वडील महेश यांनी 19 जून रोजी करारी पोलीस ठाण्यात मुलगा विजय कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून तातडीने हरवल्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आला. चौकशीच्या आधारे, रणजीत कुमार याने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विजय कुमारचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले. आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.