तरुणीने प्रेम संबंध पुढे सुरू ठेवण्यास सीला5 नकार आणि घडला भलताच प्रकार
म्हापसा / नवप्रहार मीडिया
त्याचे वयाने 8 वर्ष मोठ्या असलेल्या तरुणीवर प्रेम होते. ती हे देखील त्याच्यावर प्रेम होते .पण काही कारणामुळे तिला त्याच्याशी प्रेम संबंध तोडायचे होते. त्यामुळे तिने त्याला शेवटचे समजावून सांगण्यासाठी बोलावले होते. ती आपल्या मित्र आणि मैत्रिणीला ओबात घेतले.चर्चा सुरू असताना त्यांच्यात राडा झाला. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. पूवीसांनी दोघांना समज देऊन सोडून दिले. पण त्यानंतर तरुणी बेपत्ता झाली.पोलिसांनी शोध घेतला असता तिचा खून झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी येथे गॅरेज चालवणारा प्रकाश चुंचवाड (वय २२) याचे कामाक्षी (वय ३०) नावाच्या तरुणी बरोबर प्रेम प्रकरण सुरू होते. कालांतराने त्यांच्या वाद होऊ लागल्याने कामाक्षीने प्रेमसंबंध पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे प्रकाश तिला सतावू लागला होता. मंगळवारी (दि. 29) मध्यरात्री कामाक्षीने प्रकाशला अखेरचे निक्षून सांगण्यासाठी म्हापसा येथे बोलावले, आपल्या सोबत तिने तिचा मित्र व मैत्रिणीला सोबत घेतले होते.
यावेळी प्रकाशसोबत कामाक्षीची बाचाबाची झाल्यानंतर प्रकाशने कामाक्षी च्या कानशिलात लगावली. यानंतर तिघांनी प्रकाशचा आयफोन मोबाईल फोडला. त्या नंतर म्हापसा पोलिसांत जाऊन प्रकाशच्या विरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दोघांना बोलावून घेऊन कडक शब्दांत समज दिली. प्रकाशकडून लेखी हमी घेऊन त्याला जाऊ दिले. तेव्हापासून कामाक्षी बेपत्ता झाली होती, याची तक्रार तिच्या भावाने ३० ऑगस्टरोजी पर्वरी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात करून गुरुवारी रात्री प्रकाशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मृतदेह शोधण्यासाठी पोलीस त्याला घेऊन आंबोली ला निघाले आहेत.
चौकशीदरम्यान, कामाक्षीचा खून केल्याची कबुली प्रकाशने दिली. आपल्याशी असलेले प्रेमसंबंध तोडून दुसऱ्याशी तिने प्रेम प्रकरण सुरू केल्याचे कळल्यामुळे आपल्याला तिचा राग आला. त्यामुळे आपण तिला आपल्या फ्लॅटवर बोलावून तिथे तिचा खून केला. आणि मृतदेह आंबोली घाटात नेऊन जमिनीत गाडला, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पुढील तपास पर्वरी पोलीस करत आहेत .