सामाजिक

Spread the love

 

केंद्र सरकारचा ‘ग्राम विकास’ हाच संकल्प – खा. श्री.सुनील बा. मेंढे

मा.यशस्वी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतुन विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्राम विकासाचा हा संकल्प पूर्ण होत आहे. जल जीवन मिशन हे सुध्दा अशाच कल्याणकारी योजनांचा भाग असून घरा घरात मुबलक आणि शुद्ध पाणी पोहचणार असल्याचे सांगितले.

गोंदिया जिल्ह्यातील 📍नवेगावबांध येथे जल जीवन मिशन अंतर्गत 4 कोटी 97 लाख 44 हजार रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजना व सिरेगावबांध येथील 3 कोटी 56 लाख 28 हजार रुपयांच्या पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी माझ्या हस्ते दोन्ही कामाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. केंद्र सरकार ग्राम विकासाचे सूत्र हाती घेत पुढे जात आहे. जे काही चांगले आणि कल्याणकारी उपक्रम, योजना राबवित केंद्र सरकार सामन्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे, ते कार्य जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरणारे आहे. लोकांनीही या लोकहिताच्या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले. प्रत्येकाला घर, घरात गॅस आणि आता प्यायला शुद्ध पाणी ही निर्धार पूर्णत्वास जात असल्याचा आनंद असल्याचेही यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे औचित्त साधुन सामाजिक कार्यात अग्रेअर असलेल्या आमच्या जिल्हा परिषद सदस्या सौ.रचनाताई गाहाने यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि रचनाताई यांच्या समवेत नवेगाव बांध आणि भिवखिड़की येथे ताळपत्रीचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सर्वश्री मनोहर जी चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, रचनाताई गव्हाणे जिल्हा परिषद सदस्य लायकरामजी भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य, हिराताई पंढरी सरपंच नवेगाव, रमेशजी डोंगरवार उपसरपंच नवेगाव बांध, संदीपजी कापगते पंचायत समिती सदस्य, देवा जी कापगते ग्रामपंचायत सदस्य, पितांबर काशीवार ग्रामपंचायत सदस्य, दुर्गाताई शहारे ग्रामपंचायत सदस्य, सोनाली ताई नाकाडे ग्रामपंचायत सदस्य, सुप्रियाताई सांगोडकर ग्रामपंचायत सदस्य, पल्लवीताई मुंडे ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close