हटके

समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा ,खडे यानंतर बर्फात  मेलेला उंदीर

Spread the love
पुणे / नवप्रहार डेस्क 
           अरेरे.… आम्ही कुठल्या जाहिरात अथवा चित्रपटाची जाहिरात नाही करत आहोत , आणि आमचा कोणाला घाबरवण्याचा किंवा कोणाची बदनामी करण्याचा उद्देश नाही ! तर  आम्ही पुण्यात घडलेल्या सत्य घटनेबाबत आपणाला सांगत आहोत. हॉटेल च्या खाद्य पदार्थात काही वेळा माशी, झुरळ निघाल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध होत असतात. पण पुण्यात घडलेल्या घटनेने सर्व सीमा पार केल्याचे पाहायला मिळत आहे. येथे एका प्रतिष्ठित ऑमटोमोबाईल कंपनीला पुरविलेल्या समोश्यात कंडोम, गुटका आणि खडे आढळले आहेत. या घटनेची शाई ताजी असतांना बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर सापडला आहे.त्यामुळे पुणेकरात भीती पसरली आहे. 
 काल एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठीत ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यात कंडोम, गुटखा आणि खडे आढळून आले ही घटना ताजी असतानाच आचा बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे
राज्याच्या अनेक भागामध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. तापमान ४२ अंशापर्यत पोहचले आहे. या प्रंचड उन्हाच्या पारात अनेकजण शीतपेय पिणे पंसत करतात. ज्युस, उसाचा रस यासह अन्य शीतपेयांमध्ये बर्फ टाकला जातो. मात्र, यामुळे आरोग्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बर्फाच्या लादीमध्ये मृत अवस्थेत सापडेला उंदीर. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. ही घटना जुन्नर तालूक्यातील आहे.
मेलेल्या उंदरामुळे उसाचा रस, बर्फाचा गोळा, लिंबू सरबत इत्यादी पिण्यामुळे लोकांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण? बर्फ बनवणाऱ्या कारखान्यामध्ये होत असलेला हलगर्जीपणा बर्फ साठवून ठेवलेल्या ठिकाणी नसलेली स्वच्छता व त्या ठिकाणी असलेला उंदीर-घुशी यांचा वावर यामुळे त्या बर्फाच्या लादीत उंदीर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी संबधित खात्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवडमधील एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close