सामाजिक

शेतकरी झाला डिस्कव्हरी चॅनल चा कॅमेरामन आणि शूट केला असा व्हिडीओ 

Spread the love

भंडारा  / प्रतिनिधी 

         सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.टीक्त काही मजेशीर, काही मनाचा थरकाप उडवणारे, काही बोधात्मक, काही मोलाचा संदेश देणारे असतात. आपल्याकडे सहसा वन्य प्राण्यांचे व्हिडीओ बनवले जात नाही.कारण त्यासाठी एकतर जंगल सफारी करावी लागते नाहीतर तुम्हाला भ्रमंती ची सवय पाहिजे. पण भंडारा जीह्यातील मोहाडी तालुक्यातील हिवरा येथील एका शेतकऱ्याने डिस्कव्हरी चॅनल चा कॅमेरामन बनत एक व्हिडिओ बनवला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भंडारा जिल्ह्यातून हा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये 2 काळविटांची झुंज पाहायला मिळते. एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये या काळविटांचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा येथील आहे. यावेळी शेतकरी पिकाची पाहणी करण्याकरिता शेतात गेले होते. तेव्हा शेतात दोन काळवीट आपसात भांडण करत असल्याचं त्यांना दिसलं. या शेतकऱ्यांना दूर उभा राहूनच या भांडणाचं संपूर्ण दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की शेतामध्ये दोन काळवीट दिसत आहेत. दोघांची झुंज सुरू आहे. बराच वेळ ते एकमेकांशी भांडताना दिसतात. मात्र, काही वेळानंतर त्यांचं लक्ष दूर उभा असलेल्या माणसांकडे जातं. यानंतर ही दोन्ही काळवीटं आपल्या आपल्या वाटेनं तिथून निघून जातात. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close