क्राइम
वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मैत्रिणीने दिले गुंगीचे औषध , तरुणीवर सामूहिक बलात्कार

बदलापूर / नवप्रहार डेस्क
बदलापूर पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. येथील एका नामांकित शाळेत दोन चीमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याकडून झालेल्या बलात्काराची घटना ताजी असताना येथे एक सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे.वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मैत्रिणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दोन परिचित तरुणांकडून बलात्कार करवून घेतल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी येथील परिसरात राहणाऱ्या भूमिका या तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं.
रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर भूमिका हिच्या घरी एका मित्राने अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचं भूमिकाने सांगितलं.
यानंतर पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. याबाबत तिने तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र हा अत्याचार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण भूमिका, साताऱ्याहून आलेला मित्र शिवम (२२) आणि संतोष (४०) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |