आई-वडिलांनी मुलांकडे लक्ष देऊन सुसंस्कृत पिढी घडविणे काळाची गरज : – प्र-कुलगुरू डॉ.संजय दुबे
जवाहरनगर ( भंडारा) :- समाजातील सर्व आई-वडिलांनी आपल्या मुलांना सुसंस्कृत करण्याचे प्रयत्न करावेत त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे त्यांची प्रगती झाली तरच समाजाची पर्यायाने देशाची प्रगती होईल कारण तेच देशाचे भावी आधारस्तंभ आहेत असे मत राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर प्र-कुलगुरू डॉ.संजय दुबे यांनी
व्यक्त केले.
ठाणा पेट्रोल पंप येथे श्री संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना तर्फे आयोजित संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम प्रसंगी संताजी पालखी ,उपवर वधू परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर चे प्र कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
मनोगत व्यक्त केले.
दिनांक २३ जानेवारी ला
दत्त मंदिर येथून संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हरिभक्त परायण शामराव फटिंग महाराज गायत्री शक्तीपीठ जवाहरनगर यांच्या हस्ते पार पडले व जय भोले बाल गायन दिंडी मंडळ बेरडी यांच्या वारकरी भजनाच्या निनादात व श्री संत जगनाडे महाराज आणि श्री राम यांचा नामाचा जयघोष करत पालखीला सुरुवात झाली पालखीचे गावातील चौका चौकात पूजन व स्वागत केल्या गेले मुख्य रस्त्यांनी पालखी मार्गक्रमण करत मधुबन सभागृहामध्ये पालखीची सांगता झाली त्यानंतर कार्यक्रम उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ तैलिक महासंघाचे केंद्रीय सरचिटणीस डॉ.नामदेव हटवार कार्यक्रमाचे उद्घाटक रातुम नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे ,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य ,विदर्भ तैलिक महासभेचे केंद्रीय उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, जिल्हा परिषद सदस्य आशा डोरले ,पंचायत समिती सदस्य कल्पना कुर्जेकर ,ठाणा ग्रामपंचायतचे सरपंच पुरुषोत्तम कांबळे ,निहारवाणी ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र चरडे , विविध कार्यकारी संस्था परसोडीचे अध्यक्ष धनराज राखे , संघटनेचे सल्लागार व जेष्ठ नागरिक राजहंस वाडीभस्मे , रामचंद्र कारेमोरे , ग्रामपंचायत सदस्य पल्लीश मथुरे ,निखिल तिजारे ,रश्मी मेहर ,मंदा लांजेवार, श्री संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गिरडे हे उपस्थित होते.
…………
याप्रसंगी विचार व्यक्त करताना जगदीश वैद्य यांनी संताजी जगनाडे महाराज यांचा इतिहास कथन करून त्यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थित समाज बांधवांना दिली तसेच अध्यक्ष भाषणात डॉक्टर नामदेव हटवार यांनी ओबीसी आरक्षण, जातीनिहाय जनगणना, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये नगण्य असलेले प्रमाण याबाबत दुःख व्यक्त करून विविध लढ्यामध्ये समाजाने सक्रिय होण्याची गरज का आहे, शिका, संघटित व्हा व संघर्ष क्रा असा मूलमंत्र याप्रसंगी दिला.
याप्रसंगी समाज संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या विविध महिलांच्या क्रीडा स्पर्धा व विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये विजयी स्पर्धकांना , वर्ग दहावा व वर्ग बारावा मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सायंकाळी समाजबांधवांच्या मनोरंजनासाठी सुरेंद्र कुलरकर आणि संच यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री संत जगनाडे महाराज तेली समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर गिरडे ,उपाध्यक्ष इंद्रजीत कुर्जेकर, सचिव राम थोटे ,सहसचिव पुरुषोत्तम कांबळे ,कोषाध्यक्ष गजानन लिचडे ,सहकोषाध्यक्ष श्रीकांत वंजारी ,महेश पडोळे , किशोर दंडारे ,प्रशांत बालपांडे, सुरेश बावनकुळे ,कीर्तीसागर इटनकर ,कंठीराम दंडारे ,संजय पडोळे ,बादल मेहर ,लंकेश्वर उरकुडे, गुलाब थोटे ,अरुण कांबळे ,भास्कर वाडीभस्मे , यांच्यासह युवा कार्यकारिणीचे अध्यक्ष मधुर काटेखाये , उपाध्यक्ष बाळू बावनकुळे ,सचिव प्रमोद बालपांडे ,सहसचिव शुभम काटकर ,कोषाध्यक्ष जगदीश बारई ,सहकोशाध्यक्ष देवेंद्र बडवाईक , अतुल दंडारे ,पल्लीश मथुरे ,निखिल तिजारे यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रम चे प्रास्ताविक कोषाध्यक्ष गजानन लीचडे यांनी केले .संचालन उपाध्यक्ष इंद्रजित कुरझेकर व आभार प्रदर्शन सहकोषाध्यक्ष श्रीकांत वंजारी यांनी केले.
.