अपघात

दुचाकी समोरासमोर भिडल्या; दोघांचा मृत्यू

Spread the love

वरणगाव / नवप्रहार मीडिया

                  मध्यरात्री दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन्ही दुचाकी स्वारांचा  मृत्यू झाला आहे. ही घटना शहराच्या शिवाजी नगर चौकात घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील फुलगाव येथील रहिवाशी विजय रामकृष्ण महाजन (४५) हे वरणगाव कडून घरी फुलगावकडे आपल्या मोटर सायकल (क्र.एम.एच.१९ सी.एल o२४९) ने जात असताना फुलगाव कडून वरणगाव कडे येणारी दुसरी मोटरसायकल (क्र.एम.एच.१९ ए.एच ९१८४) वरील ललित पितांबर धांडे (२६) रा. गणपती नगर वरणगाव, या दोघांची समोरासमोर शिवाजी नगर जवळ जोरदार धडक झाल्याने दोघेजण रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. व त्यांना तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरानी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या बाबत वरणगाव पोलीस रटेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस करीत आहे.

विजय महाजन हे माजी ग्रामपंचायत सदस्य होते तर दि ५ नोव्हेबर रोजी होणाऱ्या फुलगाव ग्रामपंचायती निवडणूकीत वार्ड क्र १ मधुन उमेदवारी करीत होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली, आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

तर ललित धांडे व त्याची पत्नी हे दोघेही मुबंई येथे एका स्वाटवेअर कंपणीत कामाला होते. गेल्या दोन दिवसा पुर्वीच वरणगावला सुट्टीवर पत्नीसह आले होते. बुधवार रोजी आई वडिल व पत्नीसह यावल येथे त्यांच्या काकाकडे भेट घेण्यासाठी गेले असता, पती, आई व वडील तिघ यावलाच मुक्कामी थांबले तर, ललित हा मोटर सायकलवरून रात्रीच्या वेळी वरणगावला येत असताना घराच्या थोड्याच अंतरावर त्यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेमुळे वरणगाव व फुलगाव येथे शोककळ पसरली असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close