वल्लीओद्दिन फारुखी यांच्या तक्रारीनंतर टोल व्यवस्थापन नरमले
चौथ्याच दिवसापासून राज्य रस्त्याच्या डागडुजीला केली सुरुवात*
बिलोली ( प्रतिनिधी ):
नरसी ते बिलोली दरम्यानच्या राज्य रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून हा रस्ता अवजड वाहनांच्या धावण्यासाठी रस्ता सपाट राहीलेला नाही. ज्यामुळे येथे अनेक वेळा अपघात झाले ज्यातुन अनेकांना जीव गमवावा लागला . ही बाब ओळखून काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष आणि अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष वलीओद्दिन फारूखी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे के.टी.टोल कंपनीच्या दुर्लक्षाची तक्रार केली ज्या तक्रारीमुळे चौथ्या दिवसापासून नरसी ते बिलोली राज्य रस्त्याची आता या के.टी .कन्स्ट्रक्शन कडून डागडुजी केली जात आहे. एकूणच प्रारंभी फारशी गंभीर नसलेले टोल व्यवस्थापन फारुखी यांच्या तक्रारीमुळे पुरते नरमले आहे.
बिलोली ते नरसी राज्यरस्ता हा तेलंगणा व महाराष्ट्र या राज्यांना जोडणारा रस्ता असल्याने सदर रस्त्यावरुन मोठी वाहतुक होते. मात्र सदर रस्त्यावर जागोजागी पडलेली मोठी खड्डे , रस्याची झालेली चाळणी मागील काळात अनेकांच्या जीवावर बेतली. यात नाहक जीव गमवावा लागला ..खरे म्हणजे टोल व्यवस्थापनाची बेपर्वाईच त्याला कारणीभूत होती. प्रतिवर्षी थातुरमातुर खड्डे बुजवुन पथकर आकारला जातो. मात्र वर्षाच्या आत सदर रस्ता जैसे थे वैसे होतो. मात्र या संबंधी कोणी जाहीरपणे व्यवस्थापनाचे कारभार चव्हाट्यावर आणले नाहीत. मात्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष वलिओद्दीन फारुखी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मागील सप्ताहात देगलुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता कार्यालयात यासंबंधी तक्रार केली. निवेदन देऊन टोलबंदचा इशारा दिला होता. मात्र या इशाऱ्याने टोल व्यवस्थापन खडबडुन जागे झाले. आणि राज्य रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली. खड्डे बुजवण्याचे काम चालू झाले. सद्या नरसी ते बिलोली पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत आहेत.
वास्तविक पाहता सदर रस्त्यावरुन वाहणाऱ्या वाहनांकडुन पथकर आकारले जाते. मात्र रस्त्याच्या डागडुजीबदल कंपनी गंभीर नाही. शासनाने पथकराच्या मोबदल्यात रस्त्याची देखभाल व डागडुजी सातत्याने करावी असे निर्देश दिले असतांना त्याची अंमलबजावणी या कंपनीकडून होतेच असे नाही हे बिलोली राज्यरस्त्यावरुन अनेकदा दिसुन आले. मात्र फारुखी यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना यासाठी समोर यावे लागते ही मोठी शोकांतिका आहे याचा खेद वाटतो. प्रारंभी फारशी गंभीर नसलेले टोल व्यवस्थापन फारुखी यांच्या इशाऱ्याने कामाला लागले. आता या रस्यावरील खड्डे किती काळ राहतात की पुन्हा ये रे माझ्या मागल्या होईल हे पाहणे औत्सुक्याचे असेल.