विदेश

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाईची टांगती तलवार 

Spread the love

अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅप यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत आहे. त्यांच्यावर सन 2020 मध्ये जॉर्जिया शहरात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी  उलथवण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांच्यासह  18 लोकांवर  आरोप दाखल आहे

माजी राष्ट्रपतींवर जॉर्जिया राज्याच्या कायद्याचे उल्लंघन करण्यासह 13 गुन्ह्यांचा आरोप आहे. जॉर्जिया राज्याच्या फुलसम काउंटीचे जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी जानेवारी 2020 मध्ये ट्रम्प यांच्या जॉर्जियाचे राज्य सचिव ब्रॅड राफेनस्परगर यांना केलेल्या फोन कॉलच्या चौकशीतून हे आरोप समोर आले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2020 च्या निवडणुकीतील पराभवाचा बेकायदेशीरपणे षड्यंत्र रचल्याच्या आरोपाखाली जॉर्जियामध्ये आरोप ठेवण्यात आले आहेत. हा चौथा गुन्हेगारी खटला असून, निवडणूक निकालात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर दुसऱ्यांदा करण्यात आला आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close