ब्रेकिंग न्यूज

पखाले ‘  साहेब वाळू तस्कर पळाले की आपण ‘ … ल्ले ‘

Spread the love
नायब तहसीलदार पखाले यांची रायपूर कासारखेड येथे धाड , पण कारवाई गुलदस्त्यात 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                     तहसीलदार यांना बदलीचे वेध लागल्याने त्याचे तहसील मध्ये होत असलेल्या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. याचाच फायदा नायब तहसीलदार आणि काही खाजगी लोकांकडून उचलल्या जात आहे. नुकतेच नायब तहसीलदार वसंत पखाले यांनी तालुक्यातील रायपूर कासारखेड येथे धाड टाकली पण काय कारवाई झाली हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या प्रकरणातील संभ्रम आणखी वाढला आहे.
                     तहसीलदार गोविंद वाकोडे यांना बदलीचे वेध लागल्याने आणि कण्यारत्नाच्या आगमनामुळे हर्षित असल्याने व वारंवार गावी जात असल्याने तालुक्यात सुरू असलेल्या अवैध कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. याचाच गैरफायदा नायब तहसीलदार आणि काही खाजगी लोकांकडून उचलल्या जात आहे.
पखाले यांची धाड पण कारवाई गुलदस्त्यात – सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नायब तहसीलदार हे त्यांना त्यांच्या सूत्रा कडून मिळालेल्या माहिती प्रमाणे रायपूर कासारखेड येथे पोहचले होते. पण त्यांच्या मते त्यांना पाहताच वाळू तस्करांनी ट्रॅक्टर मधून वाळू खाली करून टाकली.  रिकाम्या ट्रॅक्टर वर कारवाई करणे हणजे स्वतःचे हात बांधून घेण्याचा प्रकार असल्याचे त्यांचे मत आहे.
वाळू तस्कर पळाले की आपण  ‘ … ल्ले ‘ – सूत्रांकडून मिळलेल्या माहिती नुसार एनटी साहेब जेव्हा घटनास्थळावर पोहचले तेव्हा दोन ट्रॅक्टर तीन चतुर्थांश वाळू ने भरले होते. पखाले साहेबांनी मनावर घेतले असते तर नक्कीच कारवाई झाली असती. पण सदरची कारवाई घेऊन देऊन सेटल झाल्याचे बोलल्या जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close