सामाजिक

राजर्षी शाहू महाराज पुण्यस्मृती उपक्रमाचे ; सन्मानपत्र वाटप…!

Spread the love

 

महापुरुषांचे विचार तळागाळा पर्यंत पौचावे,व वाचन संस्कृती वाढावी .
तथा मराठी भाषा समृद्ध व्हावी, आणि मराठी भाषा संवर्धन या अनुषंगाने, ‘वाचन छंद प्रेमी’साहित्य समूह’ विविध उपक्रमाचे आयोजन
करण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्य स्मृती निमित्त,
वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहात, दिनांक ६ व ७ मे रोजी दोन दिवसीय विषेश उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमास साहित्यिक, लेखक/कवीनी भरघोस प्रतिसाद देत, दर्जेदार व विविधांगी लेखन सादर केले.
दरम्यान, साहित्यिक, नं. भा. कोहळे, स्वाती कुळकर्णी व डॉ. प्रा. अशोक शिरसाट अकोला, यांना “सर्वोत्कृष्ट ” तर, प्रा. पी. एस. बनसोडे , दीपककुमार सरदार, मा.अशोक वाघमारे, डाॅ. चंद्रशेखर मुळे यांनी ‘उत्कृष्ट’ लिखाण सादर केले.
दरम्यान,
‘वाचन छंद प्रेमी’साहित्य समूह, संस्थापक-अध्यक्ष
बबनराव वि आराख यांनी
परिक्षक, मनोहर पवार, ग्राफिक्सकार पांडुरंग आलीम सर तसेच, सर्व साहित्यिक याचे आभार व्यक्त करीत,पुढील साहित्य वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close