नितीनजी कदम यांची वाढती लोकप्रियता व त्यामागील कारणे.
वाढत्या माहिती प्रक्षेपणाच्या स्पर्धेत आज आपण जगतो. या तंत्रज्ञानाच्या शतकात आज आपण वावरत असतांना काही स्वयंघोषित नेतेमंडळी , लोकप्रतिनिधी आज या माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतांना दिसून येते. परंतु प्रत्यक्ष या माहितीच्या देवाण घेवाण प्रक्रियेत जनसमान्यपर्यंत जमिनी पातळीवरील त्यांच्या या समस्या जाणून घेण्यास तंत्रज्ञान हे निकामी पडते. म्हणून शहरातील नागरिकांच्या समस्या तर सोडाच ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या ह्या सरल मार्गाने पोहचू शकत नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे फक्त आपल्या पक्षाची अथवा व्यक्तिविशेष प्रसिद्धी आपण मिळऊ शकतो…
पण मग नागरिकांच्या समस्यांचे काय ? म्हणजे एकदा लोकप्रतिनिधी निवडणुकीत यशस्वी झाला तर त्याची “विकासकामांचा देखावा करण्याचे” हे माहिती तंत्रज्ञान हे अचूकपणे त्याची भूमिका निभावतो. पण नागरिकांच्या समस्या धुळीस मिळतात.कुठलेही प्रश्न मार्गी लागत नाही.*
*या संपूर्ण बाबींना वाचा फोडण्याचे काम समाजसेवी श्री. नितीनजी कदम करतांना दिसून येत असून आता झालेल्या भव्य अश्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ यशस्वी पार पाडण्यात आला. हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव या मोर्चादरम्यान नितीनजी कदम यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले होते. आपल्या शेतीच्या विविध समस्यांसाठी शासनदरबारी मोठ्या प्रमाणावर जाणसांगर लोटला असतांना नितीनजी यांनी आपल्या खालावत चाललेल्या प्रकृतीचीही चिंता केली नाही. गेल्या कित्येक वर्षापासून नितीनजी कदम हे बडनेरा ग्रामीण भागात फिरून तिथल्या गोरगरीब ,* *शेतकरी ,शेतमजूर ,महिला ,विद्यार्थी ,अपंग ,निराधार वृद्ध, यांच्यासाठी शासनाविरोधात त्यांच्या समस्यासाठी लढा उभारला असून त्यांचा जनसंपर्क आणखीनच दांडगा दिसून येत आहे. बडनेरा शहर व ग्रामीण भागात नितीनजी कदम हे नाव आता सर्वच गटातील जनमानसाच्या ओठांवर सहज दिसून येत आहे. त्यामागील त्यांचे सामाजिक कार्यसुद्धा व्यापक स्वरूपाचे दिसून येतात. नेते अथवा लोकप्रतिनिधी कसं असावा यांची सुद्धा व्याख्या नितीनजी यांनी संक्षिप्त स्वरूपात नागरिकांसोमर आपल्या सामाजिक कार्य व जनकल्यानाच्या आंदोलनाद्वारे उत्तम उदाहरण म्हणून जनतेसमोर मांडले. फक्त आंदोलने करूनच ते थांबले नाही तर त्यामागील मांगण्याचा त्यांचा पाठपुरावा सतत सुरूच आहे.
नितीनजी हे आपल्या संकल्प बहुद्देशीय संस्थेमार्फत आपल्या सामाजिक सेवाभावी उपक्रम राबवित असतात.संकल्प बहुद्देशीय संस्थेमार्फत आरोग्यविषयक,शैक्षणिक,रोजगरासंदर्भात सेवाभावी उपक्रम राबविले जातात.२ ऑक्टो. २०२१ रोजी नितीनजी कदम यांच्या संकल्प बहुद्देशीय संस्थेच्यावतीने ‘भव्य नोकरी महोत्सव व रोजगार मेळावा आयोजित करून अमरावती जिल्ह्यातील १८४८ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड करण्यात आली.तसेच गेल्या जून महिन्यामध्ये संकल्प बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित सर्वधर्मीय व आंतरजातीय सामूहिक
विवाह सोहळ्यामुळे सर्व विदर्भवासीयांचे लक्ष वेधले. माध्यमांनीदेखील या उपक्रमाची दाखल घेत भरभरून कौतुक केले.आतापर्यंत अनेक अपघातग्रस्त , कॅन्सरग्रस्त , व विविध आजाराग्रस्त नागरिकांना मोफत उपचार नितीनजी आरोग्यसेवक म्हणून भूमिका बजावतात. तसेच शेकडो अनाथ मुलींचे कन्यादान , असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वीकारणे , वृद्जनाकरीता मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे,विद्यार्थ्यांना शालेय वस्तु वाटप करणे, कोरोणा संक्रमनादरम्यान संपूर्ण शहरात गरजूंना मोफत उत्तम प्रकारचे भोजणाचे ५००० पेक्षा जास्त डबे दररोज वाटप करणे अश्या विविध बहूआयामी सामाजिक कार्यामुळे आपल्याला त्यांच्या सामाजिक कार्याची जाणीव होते.
आणखी यापेक्षा अजून खूप काही नितीनजी यांच्या सामाजिक कार्याबद्दल सांगायच झाल्यास लिहण्यासारख खूप काही आहे. परंतु छापील मध्यमाला सुद्धा काही मजकुरच्या जागेसंदर्भात मर्यादा आहेत. म्हणून यासंबंधीचे माझे लेखान इथेच थांबवतो.*
धन्यवाद …
सुरज सुभाष कांबळे
संपर्क : ८३९०१०११८५