कपाट उघडले हाती जे लागले ते पाहून त्याचे भाग्य फुटले
लखनऊ / नवप्रहार डेस्क
14 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाने जेव्हा आपले कपाट उघडले तेव्हा त्याच्या हाती जे लागले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या सासरच्यांनी त्याच्या सोबत जे काही केले ते पाहून त्याचे आयुष्य उद्भस्त झाले.
इलाहाबाद युनिव्हर्सिटीत सहाय्यक प्राध्यापक असलेला हा पंडित, 2011 साली आसामच्या तरुणीशी त्याचं लग्न झालं. 13 मे 2024 रोजी लग्नाच्या 14 वर्षांनंतर बेडरूममधील कपाटात त्याला पत्नीचे काही कागदपत्रं सापडले. ते पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्याने पोलिसात धाव घेतली. पत्नीसह मेहुणी आणि सासऱ्याविरोधातही तक्रार केली.
कागदपत्रात असं होतं काय?
कागदपत्रांवरून पंडितला आपली फसवणूक झाल्याचं समजलं. जिच्याशी त्याने हिंदू समजून लग्न केलं ती दुसऱ्याच धर्माची निघाली. आपल्याशी लग्न करण्याआधी तिनं एका मुस्लिम तरुणाशी लग्न केलं होतं, असं त्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पत्नीची बहीण आणि वडिलांनी मिळून पंडितसोबत तिचं दुसरं लग्न लावून दिलं. या लग्नामुळे घरात इतका वाद झाला की त्याला आपल्या आईसह वेगळं राहण्याची वेळ आली. पंडितनं पत्नी, मेहुणी आणि सासऱ्यावरोधात पोलिसात तक्रार दिली.
ईटानगरमध्ये तैनात असताना किचनमध्ये गुटख्याचं पाकीट मिळालं होतं. त्याचा विरोध केल्यावर पत्नीनं नस कापण्याची धमकी दिली होती. वाद वाढल्यानंतर पत्नीनं एक व्हिडीओ व्हायरल केला आणि आत्महत्या करणार असल्याची, बदनाम करण्याची धमकी दिली. सासरच्यांनी हुंडाच्या हत्येत अडकवण्याची धमकी दिली, असं लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तात म्हटलं आहे.
वरात घेऊन आला, पण त्याचं बिंग फुटलं, सत्य समोर येताच झाला मोठा गोंधळ
छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात वरात घेऊन आलेल्या वराला वधूच्या कुटुंबीयांनी बुटांची माळा घालून मारहाण केली. वराला होत असलेली मारहाण पाहून वरातीही घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला.
गुजरात येथील एक तरुण आपल्या मित्रांसह तसंच नातेवाईकांसह कोरबा इथं लग्न करण्यासाठी आला होता. मात्र, लग्न करण्यासाठी आलेला हा तरुण आधीच विवाहित होता. या तरुणाच्या पहिल्या पत्नीने फोटो आणि व्हिडिओ वधूच्या कुटुबीयांना पाठवून संपूर्ण सत्य सांगितले. यानंतर लग्नाच्या मंडपात खूप गोंधळ झाला.
तरुणाचे आधीच लग्न झाल्याची माहिती समोर आल्यानंतर वधूच्या कुटुबीयांमध्ये मोठा राग पाहायला मिळाला. लग्न होणारचं होतं की त्याआधीच हा धक्कादायक खुलासा झाला.
दादूराम असं या तरुणाचे नाव आहे. त्याने स्वत:ला असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगत त्याने हे लग्न ठरवले होते. मात्र, ही सर्व माहिती बनावट निघाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच वराला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी मोठ्या संख्येने करण्यात आली.