शेती विषयक

पारनेर तालुक्यात सर्वत्र पावसाची धुमशान , शेतकरी पेरणीच्या प्रतिक्षेत .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर खुश झाला असून वापश्या नंतर आता खरीपाच्या पेरणी ची वाट पाहत आहे .
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतीची नांगरट करून ठेवली असून पावसाच्या प्रतिक्षेत असताना परवा शनिवारी तालुक्यात सर्वदूर पावसाने धुमशान उडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले . आठ दिवसांपासून तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत होता . शनिवारच्या पावसाने त्यावर कडी केल्याने शेतकरी राजा आता वापश्याची वाट पाहत असून बाजरी , वाल , मूग , मठ , तूर , सोयाबीन, वाटाणा हे व खरीप हंगामातील इतर पिकांच्या पेरणी साठी तयार झाला आहे . तालुक्यातील सर्वच कृषी मालाची दुकाने शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेली आहेत . जो तो शेतकरी खरीप हंगामासाठी कृषी बियाणे खरेदी करण्याच्या लगबगीत दिसून येत आहे . या कृषी मालाच्या दुकानदारांना बोलायला वेळ मिळत नाही .
औजरांच्या यांत्रिकीकरणाने आता बैलांच्या औताने शेती ची मशागत , पेरणी करणे , जवळपास आता दुरुपास्त झाले आहे . शिवाय बैल सांभाळणे च्या फंदात कोणी पडत नसल्याने सर्व च शेतकरी ट्रॅक्टरचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे .
शेतातील पिके काढल्यानंतर उन्हाळ्यात शेतीची नांगरट केली जाते , तदनंतर १ व २ महिने शेतातील माती तापली जाते , त्याने जमिनीची आग होते . जून मधील पावसाने शेतातील तापलेल्या मातेची ढेकळे फुटून जमीन थंड झाल्यावर खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी योग्य होते , त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते . पेरणी वेळेत झाली तर वेळेतच पिकांची काढणी होते व पुढील रब्बीची वा बागायती पिके वेळेतच घेता येते . त्यावरच शेतीचे वर्षे भराचे नियोजन असते , अन्यथा सर्वच गणित बिघडण्याची शक्यता असते . कृषी बियाणे खरेदी व शाळा सुरू होवून आपल्या मुलांसाठी शालेय वस्तू खरेदी करण्याची एकाच वेळी येते , सर्वच शेतकऱ्यां कडे भांडवलाची मर्यादा असल्याने आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रसंगी शेतकऱ्यांना सहकारी संस्था किंवा खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घ्यावे लागतात , नाहीतर उसन वारी करावी लागते . पण या दोन्ही गोष्टी पुर्णच कराव्या लागतात .
शनिवारी झालेल्या पावसाने शेतकरी राजा समाधानी झाला असून आज ही हवेत उष्णता जाणवत असल्याने पावसाची शक्यता दिसते . एकदा का शेतात पेरणी आटोपली की , पिके उगवून येईपर्यंत थोडीशी उसंत मिळते . तदनंतर मात्र शेतकऱ्याला आराम करायला वेळच मिळत नाही . शेतकऱ्यांना हे सर्व नियोजन पुर्ण करताना बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल दिसून येते .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close