चांदुर रेल्वे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात आज होणार नितीन बानगुडे पाटलांच शिव व्याख्यान
तालुका प्रतिनिधी- प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे येथे शिवजयंती सप्ताह अनेक कार्यक्रमाचा आयोजन करून साजरा करण्यात आला. शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचार मंचातर्फे आज दिनांक24/02/2024 रोजी शनिवारला सायंकाळी 5-00 वाजता *प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील* यांचे शिवव्याख्यान कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती उत्सवानिमित्त 19 ते 24 फेब्रुवारी पर्यंत भरगच्च कार्यक्रम होत आहे. एकोणवीस फेब्रुवारी रोजी मोटर बाईक रॅलीचीं मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. 20 फेब्रुवारीला तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शिवछत्रपती सामान्य ज्ञान स्पर्धा. 22 फेब्रुवारीला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवरायांचे प्रजासत्ताक धोरण विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. शिवाय 23 फेब्रुवारी रोजी शिवछत्रपती चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले. आणि 24 फेब्रुवारी रोजी शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रा. वीरेंद्र भाऊ जगताप माजी आमदार धामणगाव मतदार संघ तसेच डॉ.सागर वाघ अध्यक्ष
शिव शाहू फुले आंबेडकर मंच चांदुर रेल्वे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तरी या शिव व्याख्यान कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आव्हान आयोजक कमिटीच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आले.