सामाजिक

वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार सहकाराला ऊर्जादायी – खा.वाकचौरे

Spread the love

9वा वर्धापन दिन व वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न –
दशकपूर्ती वर्षानिमित्त 6% लाभांस देणार – चेअरमन मुकुंद सिनगर

शिर्डी / प्रतिनिधी

वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचा 9 वा वर्धापन दिन व दशकपूर्ती वर्षात पदार्पण सोहळा नुकताच शिर्डी येथील हॉटेल शांतीकमल’च्या प्रशस्त कॉन्फरन्स हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे उपनेते, प्रबोधन कुर्ला विद्यालयाचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना खासदार वाकचौरे यांनी सहकाराला संजीवनी देणारा “वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार” दरवर्षी देऊन आपल्या सभासदांप्रति ऋण व्यक्त करणारा उपक्रम नक्कीच सहकारासाठी ऊर्जादायी असल्याची भावना व्यक्त केली. तर प्रमुख अतिथी आदरणीय भाऊंनी संस्थेचा प्रवास थक्क करणारा असून मा.संचालक मंडळाचे कौतुक करत मुंबईला शाखा काढणार असाल तर सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सर्वप्रथम दीपप्रज्वलनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. यावेळी मागील आर्थिक वर्षात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वार्षिक सभेच्या नोटीशीचे वाचन करत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर मा.संचालक मंडळाच्या वतीने पहिला “वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार” संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक आदर्श सभासद म्हणून आदरणीय शंकरराव सूर्यभान वाणी यांना सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर संस्थेच्या 9 व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. प्रथम संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी प्रास्ताविक करत कोरोनानंतर संस्थेची वाटचाल आणि सहकार क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणीबाबत विस्तृत विवेचन केले. यापुढे दशकपूर्ती वर्षापासून सभासदांच्या हिताचे काही संकल्प करत दरवर्षी आदर्श सभासद पुरस्कार देण्याबाबत आणि या वर्षापासून आपल्या सर्व सभासदांना 6% लाभांस आणि एक भेटवस्तू देणेबाबत मा.चेअरमन यांनी घोषणा करताच सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी प्रमुख मान्यवरांपैकी अमृतसंजीवनीचे चेअरमन पराग संधान साहेब, शिर्डी पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख साहेब, वैष्णवीमाता पतसंस्थेचे चेअरमन अशोक मामा थोरे, मानद डॉक्टरेट ऍड. वसंतराव ठोंबरे सर आदींनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सर्व संचालक मंडळासह मुंबई येथील प्रगतीशील व्यावसायिक व्हा.चेअरमन राजेश धमेजानी, जेष्ठ सभासद भाऊसाहेब पाटील सिनगर, ज्ञानेश्वर पाटील सिनगर, शहाराम पाटील सिनगर यांच्यासह साईबाबा संस्थान एम्प्लॉयीज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, युवा नेते रोहित वाकचौरे, जेष्ठ पत्रकार रजनीश राणे सर, अशोक पवार, दत्ता कडू, अनंत निकम,कैलास माने, रंजन जाधव, पप्पू पडियार, गणपत गोंदकर, धोंडीराम धट, संतोष मुळम, साहेबराव सिनगर, योगेश माने, दिनकर सिनगर, अनुप गोंदकर, रविंद्र जाधव सर, नारायण पवार, मच्छिन्द्र बागल यांच्यासह बचत गटाच्या महिला व सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर सर्व सभासदांसाठी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि आधार ब्लड बँकेच्या सौजन्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, ज्यात सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीला. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संस्थेचे संचालक सर्व श्री. बाजीराव जी, शेवाळे, दीपक जी धट, अच्युत जी सिनगर, अतुल जी लोहाटे, मिलिंद जी नाईकवाडी, भागवत जी चोळके, सौ. सारिका सिनगर, सौ. वनिता गोंदकर, कार्यकारी संचालक बळीराम सिनगर, सरव्यवस्थापक गणेश वाळुंज, विभागप्रमुख अनिल कापसे यांच्यासह सर्व शाखेचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
सूत्रसंचालन नरेश पाटील सर यांनी तर संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी सर्वांचे आभार मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close