रुपलाल महाराज पुण्यतिथी सोहळ्याची महाप्रसादाने सांगता
पूर्ण शहरातून भव्यदिव्य अशी टाळ मृदुंगाच्या ,ढोल ताशांचे गजरात निघाली रथयात्रा
10 क्विंटल गव्हाचा शिरा, 8 क्विंटल तांदुळाचा भात,25 डबे डालडा,20 क्विंटल गव्हाच्या पोळ्या,21क्विंटल गुळ, 20 क्विंटल भाजीपाला,व इतरही साहित्याचे महाप्रसादाचे झाले वाटप
अंजनगाव सुर्जी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंजनगाव सुर्जी येथील खोडगाव रोडवरील विठ्ठल मंदिराचे समोरील प्रांगणात श्री संत रुपलाल महाराज यांचे पुण्यतिथी सोहळ्या
निमित्य दि १९/३/२०२३ ते २६/३/२०२३ पर्यंत ह भ प वेदांताचार्य बालयोगी श्री गोपाल महाराज कारखेडकर यांचे मधुर वाणीतून दररोज संध्याकाळी ७ ते १० ह्या वेळेत भागवत कथेचा प्रारंभ झाला होता ह्यामध्ये दररोज 4 ते 5 हजार भाविकांनी दररोज प्रवचनाचा लाभ घेतला तर ,दररोज सकाळी ९ ते १२ ,व दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ह भ प रमेश महाराज रंदे ह्यांचे व्यासपीठावरून संपन्न झाले तर कथेचा शेवट दि २६/३/२०२३ ला सकाळी 9 वाजता पासून शहरातील मुख्य मार्गावरून टाळ मृदंगाचे गजरात ढोल ताशे, बँड पथक,महिला भजन मंडळाचे उपस्थितीत भव्य रथयात्रा निघून ही विठ्ठल मंदिर येथून पानअटाई ते मोमीनपुरा ,बारगंनपुरा, सावकारपुरा , काठीपुरा, ओमचौक, ,शनिवारापेठ, आलमचौक, पाचपावली, नेताजीचौक, माळीपुरा, मार्गे द्वारका चौक, शहापूरा, तहसील रोड मार्गे जुने स्टँड ते विठ्ठल मंदिर येथे येऊन कार्यक्रमाचा शेवट ह भ प पुरुषोत्त्तम महाराज नेमाडे यांचे काल्याचे किर्तनाने होताच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ह्यामध्ये आठ क्विंटल तांदूळ, दहा क्विंटल गव्हाचा शिरा, 25 डबे डालडा, 21 क्विंटल गूळ, 20 क्विंटल भाजीपाला, 20 क्विंटल गव्हाचे पोळ्या, व इतरही साहित्याच्या महाप्रसादाचे वाटप 6 वाजेपर्यंत सुरू होते ह्यामध्ये अंदाजे 25 हजार भाविकानी महाप्रसादाचा लाभ घेतला
ह्याप्रसंगी रथयात्र्येतील भाविकांसाठी पूर्ण शहरात जागोजागी अल्पोपहार व शरबत, उसाचा रस,पिण्यासाठी पाणी , केळी ई परिपूर्ण व्यवस्था नागरिकांनकडून स्वयंस्फूर्तीने दानदात्यांकडून करण्यात आली होती ह्याप्रसंगी सर्व भक्तगणात आनंदाचे वातावरण शहरात दिसून येत होते