हटके

मधुचंद्रासाठी निघालेल्या जोडप्यातून नवविहातीता ट्रेन मधून झाली गायब 

Spread the love

किशनगंज ( बिहार ) / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                  बिहार च्या किशनगंज मधून एक आश्चर्यजनक  प्रकार समोर येत आहे. नुकतेच लग्न झालेले एक जोडपे जलपाईगुडी येथे हनिमून साठी निघाले होते. पण प्रवासीस दरम्यान नवविवाहिता ट्रेन मधून अचानक गायब झाली. ही बाब पतीच्या लक्षात आल्यावर त्याने शोधाशोध सुरू केली पण ती कुठेच सापडून न आल्याने सरतेशेवटी त्याने जीआरपी मध्ये तक्रार दाखल क3ली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार आनंद विहार स्टेशनवरून निघालेल्या या ट्रेनमध्ये मुझफ्फरपूर स्टेशन येथून एक नवविवाहित जोडपं प्रवासासाठी निघालं.ते हनिमूनसाठी न्यू जलपैगुडी येथे फिरण्यासाठी जाणार होतं. मात्र प्रवासादरम्यान ट्रेनमधून विवाहिता बेपत्ता झाली.

धावत्या ट्रेनमधून अचानक बेपत्ता झालेल्या नववधूचे नाव काजल कुमार आहे. तिचं वय हे २३ वर्षे आहे. काजल बेपत्ता झाल्यानंतर चिंतीत असलेला तिचा पती प्रिंस कुमार हिने ट्रेनमध्ये तिचा शोध घेतला. इतर प्रवाशांकडे त्याने विचारणा केली. मात्र तिचा काही ठावठिकाणा लागला नाही. ट्रेन किशनगंज स्टेशनवर पोहोचली तेव्हा काजल ही तिच्या सिटवर नव्हती.

दरम्यान, पत्नी बेपत्ता झाल्यानंतर त्रस्त झालेल्या पतीने या घटनेसंबंधात किशनगंज जीआरपी पोलीश ठाण्यामध्ये अर्ज देऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अधिक माहिती देताना जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रमुख नितेश कुमार यांनी सांगितले की, प्रिंस कुमार हात त्याची पत्नी काजल हिच्यासोबत न्यू जलपैगुडी येथे जात होती. यादरम्यान, पती आपल्या सिटवर झोपला. जेव्हा किशनगंजजवळ पत्नी तिच्या बर्थवर न दिसल्याने पती त्रस्त झाला. यादरम्यान ट्रेनमधील इतर प्रवाशांकडे चौकशी केल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी तपास सुरू केल्यावर पोलिसांनी बेपत्ता झालेल्या महिलेच्या मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट तपासला. तपासादरम्यान, तिचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे दिसून आले. तर मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे समस्तीपूर असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉल डिटेलच्या आधारावर पुढील तपास केला जात आहे. लवकरच त्यातून काही माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र काही बरे वाईट झाल्याचा भीतीने महिलेचा पती आणि दोघांचेही कुटुंबीय चिंतेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close