हटके

लग्नाला विरोध प्रेमी युगलान उचलले टोकाचे पाऊल 

Spread the love

नंदुरबार / नवप्रहार डेस्क

                 धीरज आणि वैष्णवीबेन यांचे ऐकमेकांवर प्रेम होते. त्यांना लग्न करायचे होते. पण त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी ‘ जिऍंगे तो साथ मरेंगे तो साथ ‘ असा प्राण केला होता. त्यांनी कुटुंबियांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण कुटुंबीय मानत नसल्याने त्यांनी जगाचा निरोप घेण्याचे मनाशी ठरवुन तापी नदीत उडी मारली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. धीरज भाईदासभाई मराठे (वय 26) आणि वैष्णवीबेन अनिलभाई मराठे (वय 20) असे मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील एक तरुण आणि एक तरुणी शनिवारी (दि.13) पासून बेपत्ता असल्यामुळे त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, रविवारी (दि.14) गुजरात हद्दीतील जुना कुकरमुंडा शिवारात तापी नदीच्या पात्रात दोन मृतदेह आढळून आले. स्थानिक पोलिसांनी तातडीने दखल घेऊन मृतदेह बाहेर काढण्याची तजवीज केली. यातील मयत तरुण नंदुरबार शहरातील धीरज मराठे तर, मयत तरुणी वैष्णवीबेन अनिलभाई मराठे (वय 20) असल्याचे निष्पन्न झाले.

तापी नदीच्या पुलापासुन जवळच मृतदेह आढळून आल्याने दोघांनी सोबतच आत्महत्या केल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. यासंदर्भात निजर तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत वैष्णवी मराठे हिचा रविवारी विवाह होणार होता. परंतु, त्याच्या आधीच ही दुर्घटना घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धीरज आणि वेष्णवी यांचे प्रेम संबंध होते. तथापि त्यांच्या लग्नाला विरोध होता. म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याची सर्वत्र चर्चा आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close