नवनित विद्यालय खमारी (बुज.) चे सुयश
भंडारा / प्रतिनिधी
मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा या विद्यालयाचा मार्च २०२५ च्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल ९६.५५% असून परीक्षेला बसलेल्या एकूण २९ विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्यासह ४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी, व्दितीय श्रेणीत ९ विद्यार्थी, उत्तीर्ण श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून गुणानुक्रमे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक जयश्री शिवलाल दमाहे ८८.६०%, व्दितीय क्रमांक अस्मिता केशोराव खैरे ८७.४०%, तृतीय क्रमांक स्वेता राजेंद्र सातक ८३.४०% तर चतुर्थ क्रमांक आवेश धनात्री देवगडे ७५.६०% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष किसनजी गजभिये, संस्था सचिव हिरालाल गजभिये, संस्था सहसचिव किशोर गजभिये, मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, प्रा. नानाजी गजभिये, प्रा. अरुण कांबळे, प्रा. दिनदयाल दमाहे, सुनिल नागदिवे, सुमिता गजभिये, निर्मला रंगारी, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, संजीव मेश्राम यांनी केले.