सामाजिक
शिरजगाव कसबा मध्ये केबल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.
प्रतिनिधी मुबीन शेख
दि.२७/०४/२०२३
शिरजगाव कसबा : पोलीस स्टेशन हद्दीतील केबल मोटर पंप चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत शिवारातील मोटार व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरांचा वाढलेला हौदोस केव्हा थांबणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. दिनांक २४ एप्रिल ला मध्यरात्री डोहान नाला शेत शिवारातील पुन्हा तीन शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटर केबल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.असून, पोलीसांनी वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1