क्राइम

दादर स्टेशन वर सूटकेस मध्ये सापडलेल्या मृतदेह प्रकरणात नवीन ट्विस्ट , हत्येचे विदेशी कनेक्शन 

Spread the love

मुंबई  /  विशेष प्रतिनिधी 

              मूकबधीर साथीदारा कडून  मूकबधीर असलेल्या अर्शद च्या हत्येत रोज नवनवीन खुलासे होत असल्याने पोलीस देखील निष्कर्षावर पोहचू शकले नाहीत. पण या हत्याकांडा मागे विदेशी कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे. आणि पोलिसांनी आता आपल्या तपासाची दिशा त्या दिशेला वळवली आहे. अर्शद ची हत्या करून मृतदेह सुटकेस मध्ये भरून तुतारी एक्स्प्रेस ने कोकणा कडे जात असताना दादर स्टेशन वर पोलिसांना संशय आल्याने या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी जय चावडा आणि शिवजित सिंग या दोघांना अटक केली होती. अर्शद, जय आणि शिवजित हे तिघेही मूकबधिर आहेत. जय चावडा आणि शिवजित सिंग यांच्याकडून हत्या प्रकरणाच्या चौकशीत दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहेत. सुरुवातीला यामध्ये पैशांचा व्यवहार आणि अनैतिक संबंधांचा पैलू समोर आला होता. मात्र, याप्रकरणात सातत्याने परदेशातील एका व्यक्तीचा काहीतरी संबंध असल्याचे अनेक संदर्भ आणि पुरावे समोर येताना दिसत आहेत.

जय चावडा आणि शिवजित सिंग यांनी पायधुनी येथे अर्शदची हत्या केली होती. त्यावेळी शिवजितने अर्शदचे सगळे कपडे उतरवून त्याला मारहाण केली होती. नंतर डोक्यात हातोडी घालून अर्शदचा शेवट केला होता. यावेळी शिवजित सिंगने एका व्यक्तीला व्हीडिओ कॉल केला होता. या व्यक्तीचे नाव जगपाल सिंग असल्याचे समोर येत आहे. जगपाल सिंग दुबई किंवा बेल्जियममध्ये असल्याचा संशय आहे. शिवजित सिंगने अर्शदला ठार मारताना जगपालला व्हिडिओ कॉल केला तेव्हा त्याने हा व्हीडिओ कॉल आणखी दोन महिलांना दाखवला. त्यामुळे जगपालनेच अर्शद अली सादिक शेखला मारण्यासाठी सुपारी दिली होती का, यादृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत.

जगपालने अर्शदची सुपारी का दिली असावी? पोलिसांना नेमका कोणता संशय

जगपाल हा जय चावडा याचा जवळचा मित्र होता. जय चावडा हा सधन कुटुंबातील असून त्याचे नातेवाईकही परदेशात राहतात. मूकबधिरांच्या वर्तुळात जगपाल सिंगला मोठा मान होता. परंतु, अलीकडच्या काळात अर्शद अली सादिक शेख यालाही मूकबधिर समूहात मान मिळू लागला होता. त्याला मानणाऱ्यांची संख्या वाढत होती. याच रागातून जगपाल सिंग याने अर्शदचा काटा काढला असावा, असा संशय आहे. पोलिसांनी आता जगपाल सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

व्हिडीओ कॉलवर शिवजीतनं अर्शदची हत्या केल्याचे दाखवले. त्यानंतर शिवजीतनं जगपालला सांकेतिक भाषेत “काम हो गया”, असा इशारा दिला. त्यानंतर पुढे याच व्यक्तीनं हत्येचा लाईव्ह व्हिडीओ मुंबईसह इतर शहरांमधील मूक बधिरांसाठी असलेल्या टीव्ही डिफ व्हिडीओज या ग्रुपवर शेअर केला होता. ही व्यक्ती दुबईतून सूत्रं हलवत असल्याचे अर्शदच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. हत्येच्यावेळी बेल्जियमच्या मोबाईल क्रमांकावरून 7 मिनिटांचा व्हिडीओ कॉल सुरू असल्याचेही समोर आले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close