क्राइम

पूजा गवांडे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Spread the love
 हत्या प्रियकराने नाही तर पतीने केल्याचे उघड 
छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी 

         येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आणि हत्या झालेल्या तरुणी पूजा गवांडे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पूजाची हत्या प्रियकर नाही तर तिच्या पतीने केली आहे. त्यामागे सोडचिठ्ठी हे मुख्य कारण असल्याचे तपासात समोर आले आहे.
 आरोपी सत्यम गवांडे हा महिलेचा दुसरा पती असून नात्याने चुलत दीर असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीमुळे प्रकरणाला वेगळंच वळण मिळाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा थरार पाहायला मिळाला. गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कामावर असलेल्या पूजा सुदाम गावंडेचा पती सत्यम हा पेट्रोल पंपावर आला दोघांमध्ये सुरुवातीला काही वेळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक आपल्या खिशातून चाकू काढला आणि काही समजण्याच्या आत पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले  त्यानंतर तो तिथून पसार झाला. अतिरक्तस्त्रावामुळे पूजा गावंडेचा जागेवर मृत्यू झाला.

महिलेवर का हल्ला केला? कारण समोर

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असात, मृत महिलेचे अगोदर लग्न झालेले होते. महिलेला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर मृत महिलेने सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदीच्या मंदिरात काही महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. मात्र लग्नानंतर हे दोघे सोबत राहत नव्हते. सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे होते त्यासाठी तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता. मात्र पूजाने सोडचिठ्ठी देण्यास नकार दिला त्यातूनच त्याने पूजाचा गळा चिरून खून केला. त्यानंतर करमाड पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासामध्ये ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं?

पेट्रोल पंपावर ग्राहकांची वर्दळ असताना ही घटना घडल्याने उपस्थितांची भंबेरी उडाली. पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी सत्यमने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात हा खून प्रेमप्रकरणातील वादातून किंवा संशयातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल पंपावरील एका व्यक्तीने वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र चाकूचा धाक दाखवत आरोपीने त्याला देखील धमकवल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close