शेती विषयक

नेर तालुक्यात पावसाने केला कहर,शेतशिवारात पाणिच पाणी, पिकासह माती गेली वाहून

Spread the love

 मदतीसाठी शेतकऱ्यांची पालकमंत्र्यांपुढे ‘टाहो संयुक्त पंचनामे करून तात्काळ मदतीचे दिले निर्देश.
नेर :- नवनाथ दरोई
नेर तालुक्यातील सावरगाव काळे,मोझर येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.शेतशिवारात पेरलेली बियाणे मातीसकट वाहून गेली.
‘उरलेल्या खडकाळ जमिनीमद्ये आता आम्ही काय पेरावे? असा सवाल करीत आर्त टाहो सावरगाव काळे येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढे फोडला आहे.
आज पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी नेर तालुक्यातील सावरगाव काळे येथील नुकसानग्रस्त शेतींची पाहणी केली.यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे,सीइओ श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा सभापती मनोज नाल्हे, माजी उपसभापती प्रवीण राठोड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे,जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद लहाडे, वीजवितरणचे कार्यकारी अभियंता वाकडे, उपकार्यकारी अभियंता मनीष फरकाडे, बिडीओ राजीव शिंदे, उपविभागीय अभियंता सुनील राठोड उपस्थित होते.
यावेळी ना.राठोड यांनी सावरगाव येथील राजेंद्र गादेकर यांच्या शेतातील पाहणी केली असता,३ एकर मद्ये सोयाबीन , कापुस, तुरीची लागवड केली होती. शेतालगत असलेल्या शिरजगाव येथील धरणाचा कालवा फुटल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले.एवढेच नव्हे तर शेतातील मातीसकट पेरलेली बियाणे वाहून गेली. या भागातील सुनील म्हात्रे, सुधीर ठाकरे, विठ्ठलराव ठाकरे,अनिल उघडे,निवृत्ती उघडे,अण्णा उघडे , रामकृष्ण उघडे,प्रतीक काळे, राजू जयस्वाल या शेतकऱ्यांच्या शेतात प्रंचड नुकसान झाले आहे.याभागातील जवळपास १५० एकरच्यावर शेतातील नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
यावेळी सावरगाव येथील खुल्या सभागृहामध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.या भागातील अडीअडचणी जाणून घेतल्या.यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीवरून शिरजगाव येथील धरणावरून जाणाऱ्या कॅनॉल दुरुस्ती करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.सोबतच नाला खोलीकरण,पांदनरस्ता,जलयुक्त शिवारामधील कामे करता येईल याचा आढावा घेतला. निसर्गाच्या प्रकोपाला खचू नका.आम्ही कायम तुमच्या सोबत आहो.असा विश्वास देत उपस्थित शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांनी धीर दिला.यावेळी उपविभागीय अभियंता प्रकाश परळीकर,सहाय्यक गट विकास अधिकारी आशिष राऊत, कृषी अधिकारी, दीपमाला बिरारीस . माजी जि.प सदस्य भरत मसराम, युवासेना उपाध्यक्ष दिग्रस विधानसभा इंद्रजीत चव्हान,प्रशांत मासाळ,गजानन भोकरे ,मुकुंद गायनर,उमेश गोळे, मुकुंद गावंडे,बियाणे वाहून गेलेल्या शेतकऱ्यासाठी प्रदामोदर मुंजेवार यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close