भोकर तालुक्यातील भोसी गावात चोरट्यांचा धुमाकुळ

शेतकऱ्याच्या घरातून तबल पाच लाखाचा ऐवज लंपास
भोकर (प्रतिनिधि):
महेंद्र कानींदे
तालुक्यात कुठे ना कुठेतरी चोरी, घरफोडीची घटना घडत असूनही पोलिस मात्र चोरट्यांना आळा घालू शकलेले नाहीत यामुळे चोरट्यांची पावत असून त्यांची हिंमत वाढली आहे.
आता ग्रामीण भागातील या घटनांमुळे शेतकरी वर्गात घबराहट सुरू झाली असून तालुक्यातील ग्रामीण भागातील मौजे भोसी येथील शेतकरी कल्याणकर यांच्या वाड्यात, लक्ष्मी हार, अज्ञात चोरटे यांनी गेटचे व घराचे कुलुप तोडून मंगळवारच्या मध्यरात्री सोने, चांदी, रोख रक्कमेसह पाच लाखाच्यावर ऐवज लुटुन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. मौजे भोसी येथील सचिन दिपकराव कल्याणकर देशमुख कुटुंबीय रात्रीला सर्वांना गाढ झोपी गेले होते रात्रीला रिमझिम पाऊस पडत होता अज्ञात चोरटे यांनी गेटचे कुलुप तोडले आत प्रवेश करून घराच्या दाराचेही कुलुप तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यातील १२ तोळे सोन्याचे गंठण मोतीमाळ, कर्णफुले, पेशवाई झुमके, चांदीचे दागिने व नगदी पन्नास हजाराची रोकड असा पाच लाखाचा ऐवज चोरून अज्ञात चोरटे पसार झाले.
बुधवार दि. २४ जुलै रोजी सकाळी दिपक व उपभागिय अधिकारी डॅनियलबेन, सहायक कल्याणकर हे बाहेर निघाले असता घराचे गेटचे कुलुप तोडल्याचे दिसून आल्याने घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने कपाटाची पहाणी केली असता त्याचेही लॉक तोडल्याचे दिसून आले व कपाटातील सोनेचांदीचे दागीने व नगदी पन्नास हजार रोकड चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने सचिन कल्याणकर यांनी भोकर पोलीसात तक्रार दिल्याने गुरन २५२ कलम ३३१ (४) ३०५ (अ) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरील घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे पोलीस उपनिरीक्षक संभाजी हानवते यांनी भेट देऊन घटनेची पहाणी केली असून पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड हे पुढील तपास करत आहेत.
रात्रीच नव्हे तर भरदिवसासुद्धा चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या चोऱ्यांमुळे पोलिस यंत्रणेसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे वाड्या वस्त्यांवरती शेतकरी वर्ग घाबरला आहे. म्हणून वरिष्ठ पातळीवरून उपाययोजना करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.