ब्रेकिंग न्यूज

वाळू डेपो चालकाच्या नातेवाईकाच्या खात्यात जवळपास कोटी तर भागीदारांना ठेंगा 

Spread the love
रक्कम डुबतील म्हणून सगळे गपगुमान 
डेपो चालकाचा भागीदार आणि सामान्य जनतेशी पंगा 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                          डेपो चालक भागीदारांना त्यांनी गुंतवलेली रक्कम तर सोडाच स्वतःच्या वाहनाने मारलेल्या ट्रिप चे पैशे सुद्धा देत नसल्याने डेपो चालक आणि भागीदार यांच्या बेबनाव चालू आहे. एकीकडे डेपो चालकाच्या नातेवाईकाच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा जवळपास रक्कम जमा असल्याची चर्चा आहे. भागीदारी साठी गुंतवलेले पैशे डुबतील म्हणून सगळे गपगुमान आहेत. तर सामान्य जनतेला रॉयल्टी असुन सुद्धा त्यांना वाळू देण्यास नकार देऊन तो जनतेशी सुध्दा पंगा घेत असल्याची चर्चा आहे.
                      मागील काही दिवसांपासून तालुक्यातील मंगरूळ रस्त्यावर असलेला वाळू डेपो चर्चेत आहे. डेपो चालक गजानन भेंडे हा भागीदार आणि सामान्य जनतेशी योग्य वागत नसल्याने ही परिस्थिती उदभवल्याचे बोलल्या जात आहे.
नातेवाईकाच्या नावावर कोटीच्या जवळपास तर भागीदारांना ठेंगा – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आणि भागदारात सुरू असलेल्या चर्चेनुसार  गजू भेंडे याच्या नातेवाईकाच्या खात्यात जवळपास 75 ते 80 लाख रुपये जमा आहेत. असे असतांना सुद्धा हा भागीदारांना पैशासाठी फिरवत आहे.
घरकुल धारकांना वाळू देण्यास टाळाटाळ – डेपो वर वाळू उपलब्ध असतांना सुद्धा गजू भेंडे हा घरकुल धारकांना वाळू देण्यास टाळाटाळ करीत असल्याने घरकुल लाभार्थ्यां मध्ये जबरदस्त नाराजी पसरली आहे. या गोष्टीचा उद्रेक होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ( क्रमशः)
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close