गांधी विद्यालयाच्या हिमांशू हत्तीमारेला विदर्भ स्तरीय वुशू स्पर्धेत कास्यपदक
आर्वी, प्रतिनिधी / पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालय मधील वर्ग आठवा अ मध्ये शिक्षण घेत असलेला हिमांशू रवी हत्तीमारे याने नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विठ्ठल रुक्माई सभागृह वर्धा येथे झालेल्या विदर्भस्तरीय खेलो मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवून शाळेला नावलौकिक मिळवलेला दिला .दिनांक 24 फेब्रुवारीला झालेल्या या स्पर्धेमध्ये हिमांशूने 45 किलो वजन गटामध्ये सहभागी होताना अतिशय चांगला खेळ करत तृतीय येण्याचा मान पटकावला. त्याला हे कास्यपदक सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन पावडे तसेच निलेश राऊत सर यांच्या शुभहस्ते देण्यात आले. हिमांशू ने आपल्या या यशाचे श्रेय त्याचे कोच प्रशिक्षक कैलास मुंजाळे यांना दिले .शाळेच्या वतीने प्राचार्य विश्वेश्वर पायले, शारीरिक शिक्षक नंदकिशोर गोडबोले, ज्योती अजमेरे वर्गशिक्षक प्रमोद नागरे इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हिमांशु चे अभिनंदन केले.